मताधिक्क्य कायम
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: सोलापूर आणि माढा मतदार संघात महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गेल्या तासाभरापासून आपले मताधिक्क्य कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. प्रणिती शिंदे या राम सातपुते यांच्यापेक्षा जवळपास वीस हजार मताहून पुढे आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील हे जवळपास 25 हजार मतांनी पुढे असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी टपाली मतांमध्येही आघाडी घेतली आहे. शेजारच्या धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या अर्चना राणजगजितसिंह पाटील यांच्यावर आघाडी घेतली आहे.
राज्यात महाविकास आघाडीची मुसंडी
राज्यपातळीवरही महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. गतनिवडणुकीपेक्षा यंदा विरोधकांना जास्त जागा मिळतील तर भाजपला काही ठिकाणी अपयश स्वीकारावे लागेल अशी सद्यस्थिती आहे. राज्यात महाविकास आघाडीस 29 तर महायुतीस 18 जागांवर आघाडी आहे.
देशात एनडीए, इंडिया आघाडीचे चित्र
देशात एनडीए 289 ठिकाणी तर इंडिया आघाडी 231 ठिकाणी आघाडीवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास साडेतीन हजार मतांनी मागे आहेत.