पहिली फेरी: जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ आघाडीवर
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जळगाव लोकसभेमधील भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये सामना रंगत आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांनी आघाडी घेतलेली आहे. 588 नोटा तर 47 हजार 670 मते पडलेली आहेत. स्मिता वाघ यांनी पहिल्या फेरीमध्ये 15225 मतांनी आघाडी घेतलेली आहे.
जळगाव लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेचे उमेदवार करण पवार व भाजपाच्या स्मिता वाघ यांच्या चुरशीची लढत होत आहे. यामध्ये पहिल्या फेरीअंती स्मिता वाघ यांना 29 हजार 702 मते तर करण पाटील पवार यांना 14777 मते मिळाली आहेत. एकूण मतदान 47 हजार 82 झालेले असून त्यापैकी 588 नोटा तर 47 हजार 670 मतदारांना पडलेली मते आहेत. यामध्ये पंधरा हजार 225 मतांनी पहिल्या फेरीअंती स्मिता वाघ यांनी आघाडी घेतलेली आहे.
हेही वाचा:
Lok Sabha Election Results 2024 | विजय तर आमचाच होणार!
LokSabha Elections : नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील आघाडीवर