सात लाख कोटींचा निकालावर सट्टा

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सट्टाबाजारात 7 लाख कोटींचा सट्टा लावला आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख कोटींपर्यंत सट्टेबाजी झाली होती. या खेपेस मात्र सट्टेबाजांनी सर्वाधिक रकमेचा सट्टा लावल्याचे विविध माध्यमांच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पान टपर्‍यांपासून गावागावांतील पारांवर निकालाबाबत गप्पा रंगल्या असताना, सट्टेबाजारानेही लक्ष वेधले आहे. मुंबई प्रमुख केंद्र सट्टाबाजार हा बेकायदा आहे. मुंबई सट्टेबाजाराचे प्रमुख …

सात लाख कोटींचा निकालावर सट्टा

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सट्टाबाजारात 7 लाख कोटींचा सट्टा लावला आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख कोटींपर्यंत सट्टेबाजी झाली होती. या खेपेस मात्र सट्टेबाजांनी सर्वाधिक रकमेचा सट्टा लावल्याचे विविध माध्यमांच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. पान टपर्‍यांपासून गावागावांतील पारांवर निकालाबाबत गप्पा रंगल्या असताना, सट्टेबाजारानेही लक्ष वेधले आहे.
मुंबई प्रमुख केंद्र
सट्टाबाजार हा बेकायदा आहे. मुंबई सट्टेबाजाराचे प्रमुख केंद्र आहे. देशातील दहा शहरांमध्ये सट्टाबाजार सुरू आहे.
रालोआला 303 चा अंदाज
एक्झिट पोलमधून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) 350 हून अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सट्टाबाजारात मात्र रालोआला 303 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
2019 चा अंदाज
मुंबई सट्टाबाजारात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाज अचूक ठरला होता. 2014 साली मात्र काँग्रेसच्या जागांबाबतचा सट्टाबाजाराचा अंदाज चुकला होता.
अंदाज कसा लावतात
विविध पक्षांचे उमेदवार आणि पक्षांवर सट्टेबाज पैसे लावतात. डाव लावण्याची पद्धत सट्टाबाजारातील अन्य प्रकारासारखीच असते.
विविध घटकांकडून सर्वेक्षण
संबंधित उमेदवार, पक्षनिहाय लोकप्रियता आदी घटकांना माध्यमातून मिळालेली प्रसिद्धी, आर्थिक स्थिती, जनमत आदी विविध घटकांची माहिती घेऊन सट्टाबाजारात डाव लावले जातात. सट्टेबाजारातील निष्कर्ष खरे नसतात. त्यामुळे या ठिकाणी सट्टेबाजाराला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.
कोलकाता : फुटबॉल, क्रिकेटसह अन्य खेळांवर या ठिकाणी सट्टा लावला जातो. या ठिकाणी मटक्यासह अन्य आयोजनांवरही सट्टेबाजी केली जाते. भाजपला 118, रालोआला 261, काँग्रेसला 128, इंडियाला 228 जागा मिळतील, असा अंदाज या ठिकाणी वर्तविण्यात येत आहे.
करनाल : रालोआला 263, तर इंडियाला 231 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भाजपला 235, तर काँग्रेसला स्वबळावर 108 जागांपर्यंत मजल मारता येईल, असा अंदाज या बाजारातून व्यक्त करण्यात आला आहे.
प्रमुख सट्टाबाजारांचा अंदाज
फलोदी (राजस्थान) ः भारतामधील सर्वात मोठा सट्टाबाजार या ठिकाणी चालतो. क्रिकेट, निवडणुकांसह अन्य खेळांवर या ठिकाणी सर्वात मोठा सट्टा लावला जातो. भाजपला 209 ते 212, रालोआला 253, काँग्रेसला 117, इंडिया आघाडीला 246 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
इंदूर : शेअर बाजार, मुद्रा बाजार, वस्तू बाजार आदींवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो.
हाजी अली (मुंबई) : क्रिकेट, अश्वशर्यतींसह अन्य खेळांवर या ठिकाणी सट्टा लावला जातो. भाजपला 295 ते 305, तर काँग्रेसला 56 ते 65 जागा मिळतील, असा अंदाज या ठिकाणी वर्तविण्यात आला आहे.
सट्टेबाजी कशी चालते
पूर्वी फोनवरूनच सट्टेबाजीचे व्यवहार होत असत. आता ऑनलाईन पोर्टलमधून सट्टा खेळला जातो. कारवाई होऊ नये, यासाठी ऑनलाईन पोर्टलचे सर्व्हर विदेशात असतात. विदेशातून या सट्टाबाजारावर नियंत्रण ठेवले जाते. विविध स्रोतांकडून माहिती घेऊन जिंकणारे उमेदवार आणि पक्ष यावर पैसा लावला जातो. विविध मतदारसंघांतून लोकप्रिय उमेदवार आणि पक्षांची माहिती मतदारांकडून घेतली जाते.

Go to Source