जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ क्लॉडिया शीनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mexico President : मेक्सिकोच्या 200 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला देशाची राष्ट्राध्यक्ष बनली आहे. 2 जून रोजी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम यांना सर्वाधिक म्हणजे 58.3% मते मिळाली. तर नॅशनल ॲक्शन पार्टीचे शोचिल गाल्वेझ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना केवळ 28 टक्के मते मिळाली. दोन महिलांमध्ये झालेल्या ऐतिहासिक राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत …

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ क्लॉडिया शीनबॉम मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mexico President : मेक्सिकोच्या 200 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला देशाची राष्ट्राध्यक्ष बनली आहे. 2 जून रोजी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम यांना सर्वाधिक म्हणजे 58.3% मते मिळाली. तर नॅशनल ॲक्शन पार्टीचे शोचिल गाल्वेझ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना केवळ 28 टक्के मते मिळाली.
दोन महिलांमध्ये झालेल्या ऐतिहासिक राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मेक्सिकन लोकांनी रविवारी मतदान केले. खरं तर, मेक्सिकोचा इतिहास लिंगभेद आणि भेदभावाचा आहे आणि म्हणूनच या देशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सुमारे 10 कोटी लोकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक ठरली.
या निवडणुकीसाठी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होती. ज्यात डाव्या पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम, विरोधी पक्षांच्या युतीचे प्रतिनिधित्व करणा-या आणि पुराणमतवादी पीएएन पक्षाच्या नेत्या शोचिल गाल्वेझ आणि नागरिक चळवळीचे प्रतिनिधित्व करणा-या जॉर्ज अल्वारेझ मेनेझ यांचा समावेश होता. रविवारी झालेल्या निवडणुकीत 500 महापौर आणि 128 सिनेटसाठी 10 कोटी लोकांनी एकत्र मतदान केले.
मेक्सिकोच्या निवडणूक इतिहासातील ही सर्वात हिंसक निवडणूक असल्याचेही बोलले जात आहे. एका रिपोर्टनुसार, या निवडणुकीदरम्यान आतापर्यंत सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या गुरेरो प्रांतात 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमध्ये शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका 2018 मध्ये झाल्या होत्या. त्या काळात सुमारे 150 लोकांना प्राण गमवावे लागले होते.
अमेरिकेत महिलांना 1920 मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला, तर मेक्सिकोमध्ये 1953 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.