मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपविले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपविल्याची घटना आज (दि.३) पहाटे पहाटे ४ च्या सुमारास घडली. नरिमन पॉइंट येथील शासकीय निवासस्थानाच्या १० व्या मजल्यावरून तिने उडी मारली. लिपी विकासचंद्र रस्तोगी (वय २७) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
लिपी हिने उडी मारल्यानंतर तिला तत्काळ जीटी रुग्णालयात दाखल केले.मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. ती सोनीपत (हरियाणा) येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती. शिक्षणातील ताणतणावामुळे ती चिंतेत होती. तिने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे. या घटनेची कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राधिका रस्तोगी असे लिपीच्या आईचे नाव आहे. तर वडिल विकासचंद्र रस्तोगी हे आयएएस अधिकारी आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
The 27-year-old daughter of an IAS officer of Maharashtra cadre died allegedly by suicide. Details awaited.
— ANI (@ANI) June 3, 2024
“Lipi (27), daughter of Vikas Chandra Rastogi and Radhika Rastogi, jumped from 10th floor of their Govt accommodation at Nariman Point at around 4am. She was immediately taken to GT Hospital where she was declared dead. She was studying LLB at Sonipat Haryana and was in anxiety…
— ANI (@ANI) June 3, 2024
हेही वाचा
पाथर्डी-मुंबई बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने अपघात; चालकासह 9 जखमी
रेल्वे डब्यांची संख्या कधी वाढवणार? पुणे- मुंबई- पुणेदरम्यानची स्थिती
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी