पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून गोट्या पळाला!

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील कुख्यात आरोपी योगेश ऊर्फ गोट्या पारधे मध्यरात्रीनंतर पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून पसार झाला. हेडकॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे त्याला येथील दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात दुचाकीवरून नेत होते. रविवारी मध्यरात्रीनंतर सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. परवानगीशिवाय पोलिसानेे नेले दोघांना तुरुंगाबाहेर गोट्या पारधे कोपरगावातील दुय्यम कारागृहात न्यायालयीन …

पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून गोट्या पळाला!

कोपरगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील कुख्यात आरोपी योगेश ऊर्फ गोट्या पारधे मध्यरात्रीनंतर पोलिसाच्या दुचाकीवरून उडी मारून पसार झाला. हेडकॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे त्याला येथील दुय्यम कारागृहातून ग्रामीण रुग्णालयात दुचाकीवरून नेत होते. रविवारी मध्यरात्रीनंतर सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला.
परवानगीशिवाय पोलिसानेे नेले दोघांना तुरुंगाबाहेर
गोट्या पारधे कोपरगावातील दुय्यम कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात खुनासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. कोपरगावच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्याची रवानगी दुय्यम कारागृहात केली होती. पोलिस ढाकणे त्याला उपचारासाठी दुचाकीवरून रुग्णालयात नेत होते. दरम्यान, वाबळे हॉस्पिटलजवळील टी पॉईटवर दुचाकीचा वेग कमी होताच पारधे दुचाकीवरून उडी मारून पसार झाला.
ढाकणे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा यांच्यासह पोलिस पारधेचा शोध घेत आहेत. शिर्डी येथे 16 मे 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवगीताची रिंगटोन मोबाईलमध्ये वाजली म्हणून सागर शेजवळ या दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी 9 आरोपींपैकी योगेश सर्जेराव ऊर्फ गोट्या पारधे (रा. कोल्हार, ता. राहाता, जि. नगर) हा एक आरोपी आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात खुनासह विविध गुन्हे दाखल असलेला पारधे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली होती.
रक्ताची उलटी झाल्याचा बहाणा आणि पोलिसाची नियमाला बगल
गोट्या पारधे याने रविवारी (दि. 2) मध्यरात्री ‘रक्ताची उलटी झाली, छातीत दुखत आहे,’ असे सांगत रुग्णालयात नेण्याची विनंती पोलिसांना केली होती, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुख्यात आरोपीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्याबाबत कोणत्याही नियमाचे पालन झाले नसल्याचे समजते.
कर्तव्यावरील पोलिस हेडकॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी न घेता, स्वतःच्या जबाबदारीवर दोन आरोपींना तुरुंगाबाहेर नेल्याचे समजते. दोन आरोपींसह पोलिस, असे तिघेजण मोटरसायकलवरून निघाले होते. विशेष म्हणजे या आरोपींना बेड्याही घातलेल्या नव्हत्या. एक आरोपी पळाल्यानंतर या पोलिसाने दुसर्‍या आरोपीच्या मदतीने पळालेल्या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
हेही वाचा 

जिल्ह्यात पावणेतीन टन सोनं गहाण!
मोकळ्या जागा झाल्या ‘ओपन बार’; नागरिकांकडून कारवाईची मागणी
Lok Sabha Exit Poll 2024 | उत्कंठा मतमोजणीची : प्रशासन सज्ज; उद्या दुपारी तीनपर्यंत पहिला निकाल हाती येणार