एसटीचा अपघात; चालक गंभीर, तर वाहकासह प्रवासी किरकोळ जखमी
वाघोली : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे-नगर महामार्गावर पेरणे फाटा येथे रस्त्यावरील लोखंडी दुभाजकाला धडक बसून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला शनिवारी मध्यरात्री अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहकासह 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले, तर चालक गंभीर जखमी झाले आहेत. एसटी महामंडळाची बस पाथर्डीहून मुंबईला जात होती. पेरणे फाटा येथे बस आली असता स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडकली.
अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनासह बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर, चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त बस वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा
जिल्ह्यात पावणेतीन टन सोनं गहाण!
गृहनिर्माण संंस्थांचे 601 ’डीम्ड कन्व्हेयन्स’ पूर्ण; जिल्हा उपनिबंधकांची माहिती
चालक बापाची अनोखी सेवानिवृत्ती; वाहक मुलाने घेतले खांद्यावर