एक्झिट पोलमध्ये पुण्यात मोहोळ आघाडीवर; धाकधूक वाढली

एक्झिट पोलमध्ये पुण्यात मोहोळ आघाडीवर; धाकधूक वाढली

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे विजयी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या एक्झिट पोलने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचीही धाकधूक वाढविली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नक्की कोणाला कौल मिळणार, याचे अंदाज दर्शविणाऱ्या विविध वृत्तवाहिन्या आणि संस्था यांचे एक्झिट पोल शनिवारी सायंकाळी जाहीर झाले.
त्यात जवळपास सर्वच पोलमध्ये एनडीए सत्तेत येईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातही हाच कल असून, चारपेक्षा अधिक प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे मोहोळ उमेदवार विजयी होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एका खासगी संस्थेच्या पोलमध्ये धंगेकर विजयी होतील, असा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील निवडणूक अखेरच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत खूप उत्सुकता आहे.
हेही वाचा

एअरफोर्स परिसरातील बांधकामांचे होणार सर्वेक्षण..!
पुण्यात मोहोळ की धंगेकर? उत्कंठा शिगेला; कार्यकर्ते हमरीतुमरीवर
पंखांसहित ‘ड्रीम चेसर’ अवकाश विमान उड्डाणासाठी सज्ज