व्हेल माशाशी अनोखी मैत्री!

मेक्सिको : सोशल मीडियाच्या या जमान्यात काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असे सर्व प्रकारचे आश्चर्यकारक व्हिडीओ इंटरनेटवर बरेच चर्चेतही राहतात. कधी वन्य प्राण्यांचे व्हिडीओे आश्चर्यचकित करतात तर कधी समुद्री प्राण्यांचे व्हिडीओ लक्षवेधी ठरतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका तरुणीची व्हेल माशाशी कशी अनोखी मैत्री जमली, ते दिसून …

व्हेल माशाशी अनोखी मैत्री!

मेक्सिको : सोशल मीडियाच्या या जमान्यात काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असे सर्व प्रकारचे आश्चर्यकारक व्हिडीओ इंटरनेटवर बरेच चर्चेतही राहतात. कधी वन्य प्राण्यांचे व्हिडीओे आश्चर्यचकित करतात तर कधी समुद्री प्राण्यांचे व्हिडीओ लक्षवेधी ठरतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असून यात एका तरुणीची व्हेल माशाशी कशी अनोखी मैत्री जमली, ते दिसून आले.
या व्हिडीओमध्ये एक महिला समुद्राच्या किनार्‍यावर एका महाकाय व्हेलला आहार देत असताना दिसत आहे. यादरम्यान ती महिला व्हेलसोबत थोडा वेळ खेळते आणि मासेही तिला तितकीच साथ देत असतात. इतकेच नाही तर व्हेलही महिलेची नक्कल करते. हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून तो पुन्हा पुन्हा पाहिला जात आहे. यावर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एका युजरने लिहिले आहे – प्राण्याचे किती सौंदर्य आहे, मला हे सर्व अविश्वसनीय वाटते. आणखी एका युजरने लिहिले आहे की, हा धोकादायक प्राणी इतका मैत्रीपूर्ण असू शकतो, असे मला वाटले नव्हते.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला समुद्राच्या किनार्‍यावर एका काचेच्या भिंतीजवळ उभी असताना एका महाकाय व्हेलला खायला घालत असल्याचे दिसून येते. आहार देताना ती माशांना लहान मुलासारखी वागवते. इतकेच नाही तर ती महिला जे करेल, व्हेल तिचे त्याच पद्धतीने अनुकरण करते. हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत की व्हेल माशांशी माणसाची इतकी घट्ट मैत्री कशी होऊ शकते. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्तही केले आहे.