लवकरच उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये सामील होतील ‘या’ नेत्याचे मोठे विधान

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला लागणार आहे. वेगवेगळे एक्झिट पोल समोर येत आहेत. दरम्यान निवडणूक निकाला आधीच आमदार रवी राणा यांनी रविवारी (दि.२) उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीत टीका टिप्पणी करणारे उद्धव ठाकरे आता लोकसभा निकालानंतर पंधरा दिवसात मोदी सरकारमध्ये सामील होतील, असा दावा बडनेरा …
लवकरच उद्धव ठाकरे मोदी सरकारमध्ये सामील होतील ‘या’ नेत्याचे मोठे विधान

अमरावती, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला लागणार आहे. वेगवेगळे एक्झिट पोल समोर येत आहेत. दरम्यान निवडणूक निकाला आधीच आमदार रवी राणा यांनी रविवारी (दि.२) उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
निवडणुकीत टीका टिप्पणी करणारे उद्धव ठाकरे आता लोकसभा निकालानंतर पंधरा दिवसात मोदी सरकारमध्ये सामील होतील, असा दावा बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी रविवारी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोदींनी एक खिडकी उघडी ठेवली आहे. त्याच खिडकीतून त्यांचा प्रवेश होणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान चार जूनला लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात नवनीत राणा दोन लाख मतांनी अमरावती लोकसभेतून निवडून येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
अमरावतीच्या जनतेने भरभरून नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या माध्यमातून नवनीत राणा यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास केला, असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा :

आंध्र प्रदेशमध्‍ये कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोल काय म्‍हणतो?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा अरुणाचलमध्ये डंका; जिंकल्या ३ जागा
Arvind Kejriwal | केजरीवालांचा अंतरिम जामीन संपणार, तिहार प्रशासनासमोर आज आत्मसमर्पण करणार