संगमेश्वर येथील पोलिस नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

देवरुख; पुढारी वृत्तसेवा: संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचे रविवारी (दि.२) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. जाधव यांना दुपारी हृदयविकाराचा झटका आला. रत्नागिरी येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूराला नेत असताना दख्खीण येथे त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत …

संगमेश्वर येथील पोलिस नाईक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

देवरुख; Bharat Live News Media वृत्तसेवा: संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांचे रविवारी (दि.२) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. जाधव यांना दुपारी हृदयविकाराचा झटका आला. रत्नागिरी येथे उपचार करुन पुढील उपचारासाठी कोल्हापूराला नेत असताना दख्खीण येथे त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जाधव हे अनुकंपाखाली १० वर्षांपूर्वी पोलीस सेवेत रुजू झाले होते. ते दोन वर्षापूर्वी संगमेश्वर पोलिस ठाण्यात बदलीने आले होते. रविवारी कामावर असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या  ताब्यात देण्यात आला. जाधव यांच्या मुळगावी रत्नागिरी मिर्या येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा 

रत्नागिरी: कोकणातील जलपर्यटन ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहणार
रत्नागिरी : दीड हजार गावे ‘पब्लिक अलर्ट सिस्टम’ने जोडणार : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
T20 World Cup : युवराज सिंगने टीम इंडियाला दिला विजयाचा ‘मंत्र’