भंडारा: पवनी येथे हॉटेलमधील देहव्यापार अड्ड्यावर छापा

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. येथे आढळलेल्या महिलेकडून देहव्यापार करवून अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करीत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.१) करण्यात आली. रूपेश सूर्यभान शेंडे (वय ३६, रा. चंडिकामाता मंदिर, शनिवारी वॉर्ड, पवनी) …

भंडारा: पवनी येथे हॉटेलमधील देहव्यापार अड्ड्यावर छापा

भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा : पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. येथे आढळलेल्या महिलेकडून देहव्यापार करवून अड्डा चालविणाऱ्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करीत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि.१) करण्यात आली. रूपेश सूर्यभान शेंडे (वय ३६, रा. चंडिकामाता मंदिर, शनिवारी वॉर्ड, पवनी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
भंडारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुखबिराकडून पवनी येथील कोरंभीकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल विराज बारच्या तळघरात देहविक्री व्यवसाय सुरू  असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. खबरेवरून पोलिस पथक संबंधित ठिकाणी रवाना झाले. खात्री करण्यासाठी ठरल्याप्रमाणे पंटरला समोर पाठविण्यात आले. त्याने आत गेल्यावर ग्राहक म्हणून सौदा पक्का केल्यानंतर पोलिसांना फोनने माहिती दिली. पोलिस पथकाने हॉटेलच्या मागील बाजूच्या लोखंडी शिड्यांनी तळघरात प्रवेश केला. तेव्हा हॉललगत असलेल्या एका बंद रूममध्ये बनावट ग्राहक व पीडित महिला दिसून आली.
महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची चौकशी केली. यावर तिने रूपेश शेंडे नावाच्या व्यक्तीने तिला येथे देहविक्री व्यवसायाकरिता आणले असून तो तिच्याद्वारे हा व्यवसाय करून घेत असल्याचे सांगितले. घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. रूपेश शेंडे याच्याविरूद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव पंजरवाड, प्रिती कुळमेथे व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा 

भंडारा : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू; पालकांचा आरोप
भंडारा : पोल्ट्री फार्ममधील दीड हजार कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू
भंडारा : २० हजारांची लाच घेताना तलाठी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात