ज्ञानराधा मल्टीस्टेटला ठेवीदारांचा पैसा लुटू देणार नाही : सईद खान

पाथरी, Bharat Live News Media वृत्तसेवा : अर्चना सुरेश कुटे संचलित बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत. कुटे पती-पत्नी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु आम्ही ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा वसूल केल्याशिवाय शांत बसणार नाही. मुख्यमंत्र्यांची भेटू घेऊ, वेळ पडल्यास कुटे कुटुंबीयांची संपत्ती जप्त करायला लावून सर्वसामान्य लोकांचे पैसे परत द्यायला लावू, असा निर्धार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी आज (दि.२) व्यक्त केला.
पाथरी तालुका व परभणी जिल्ह्यातील सर्व ठेवेदारांचा मेळावा शिवसेना भवन पाथरी येथे झाला. यावेळी माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, चक्रधर उगले, सर्जेराव गिराम, अनिता सरोदे आदीसह ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ठेवीदारांच्या कष्टाचा पैसा सहजासहजी ज्ञानराधा मल्टीस्टेटला लुटू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवू, असा इशारा सईद खान यांनी यावेळी दिला.
परभणी जिल्ह्यातून आलेल्या ठेवीदारांचे शिवसेना कार्यालय पाथरी येथे पासबुक, आधार कार्ड, झेरॉक्स व बॉण्ड आदी जमा करण्यात आले. यावेळी परभणी जिल्ह्यातील शेकडो ठेवीदार मेळाव्याला उपस्थित होते. एल. आर. कदम यांनी सूत्रसंचालन केले.
हेही वाचा
परभणी: गौर येथे कर्जास कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपविले
परभणी : सेलू तालुक्यातील ३ गावे ३ महिन्यांपासून अंधारात
परभणी: मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाला ३ दिवसांची कोठडी
