ब्रेकिंग : केजरीवालांनी केले तिहार कारागृहात आत्मसमर्पण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ( दि.२ जून) दुपारी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीने केलेल्या अटकेनंतर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने २१ दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. याची मुदत शनिवार १ जून रोजी संपली होती.
Delhi CM Arvind Kejriwal surrenders at Tihar jail after interim bail granted by SC ends
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2024
आत्मसमर्पणापूर्वी दुपारी तीन वाजता केजरीवाल आपल्या निवासस्थानातून राजघाटवर गेले. येथे त्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहली. यानंतर केजरीवाल आणि त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर केजरीवाल हे आम आदमी पार्टी कार्यालयात पोहोचले. येथे त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर जाेरदार हल्लाबाेल केला. यानंतर ते तिहार कारागृहाकडे रवाना झाले. सायंकाळी पाच वाजता यांनी तिहार कारागृहात आत्मसमर्पण केले. (Arvind Kejriwal)
VIDEO | Delhi CM Arvind Kejriwal returns to Tihar jail as his interim bail comes to end today.
Arvind Kejriwal was released from jail on May 10 on interim bail granted by the Supreme Court in a money laundering case linked to the alleged Delhi excise policy scam to campaign in… pic.twitter.com/xm2l6h3tvk
— Press Trust of India (@PTI_News) June 2, 2024
#WATCH | Delhi CM and AAP national convener Arvind Kejriwal, his wife Sunita Kejriwal and AAP leaders pay tribute to Mahatma Gandhi at Rajghat ahead of Arvind Kejriwal’s surrender at the Tihar Jail at the end of his interim bail by Supreme Court to campaign for the Lok Sabha… pic.twitter.com/YRADGkbQqE
— ANI (@ANI) June 2, 2024
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal and his wife Sunita Kejriwal offer prayers at Hanuman Mandir in Connaught Place.
Arvind Kejriwal will surrender at Tihar Jail later today at the end of his interim bail granted by Supreme Court to campaign for Lok Sabha elections on May 10. He… pic.twitter.com/ZcPuxwr31p
— ANI (@ANI) June 2, 2024
#WATCH | Delhi CM and AAP national convenor Arvind Kejriwal reaches party office in Delhi.
Arvind Kejriwal will surrender at Tihar Jail later today at the end of his interim bail granted by Supreme Court to campaign for Lok Sabha elections on May 10. He was asked to surrender… pic.twitter.com/V9Ae3H55sE
— ANI (@ANI) June 2, 2024
सर्वोच्च न्यायालयाचे आभार
पक्ष कार्यालयात बोलताना केजरीवाल म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने मला निवडणुकीच्या प्रचारासाठी २१ दिवसांचा जामीन मंजूर केला. त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. या २१ दिवसांपैकी एक मिनिटही मी वाया घालवला नाही. मी फक्त आम आमदी पार्टीसाठी प्रचार केला नाही तर मुंबई, हरियाणा, UP, झारखंड मध्ये गेलो. आपल्यासाठी देश महत्वाचा आहे. मी हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवला म्हणून पुन्हा तुरुंगात जात आहे. पंतप्रधान मोदींनी देशासमोर हे मान्य केले की त्यांच्याकडे माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही”
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says “Supreme Court granted me bail for 21 days to campaign for elections. I want to thank SC for that. Today, I am going to Tihar Jail again. I did not waste even a minute of these 21 days. I did not campaign only for AAP but for various… pic.twitter.com/zfUVw2X4Qg
— ANI (@ANI) June 2, 2024
ते ईव्हीएममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत
आपच्या कार्यालयात बोलतानाअरविंद केजरीवाल म्हणतात, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल आले आहेत. एका एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला ३३ जागा दिल्या आहेत, तर तिथे फक्त २५ जागा आहेत. त्यांना मतमोजणीच्या 3 दिवस आधी बनावट एक्झिट पोल का करावा लागला हा खरा मुद्दा आहे, यासंदर्भात अनेक सिद्धांत आहेत, त्यापैकी एक म्हणजे ते मशीनमध्ये (ईव्हीएम) फेरफार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
भगतसिंग म्हणाले होते की जेव्हा सत्ता हुकूमशाही बनते तेव्हा तुरुंग ही जबाबदारी बनते. देशाला स्वतंत्र करण्यासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती. यावेळी मी तुरुंगात जात असताना मला कळत नाही. परत येईल. भगतसिंग यांना फाशी झाली तर मी सुद्धा फाशी द्यायला तयार आहे, असेही केजरीवाल या वेळी म्हणाले.
#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal says “Exit polls for 2024 Lok Sabha Elections have come out yesterday. Take it in writing, all these exit polls are fake. One exit poll gave 33 seats to BJP in Rajasthan whereas there are only 25 seats there…The real issue is why they had to do… pic.twitter.com/oLkdoxh3ZL
— ANI (@ANI) June 2, 2024
‘जनता आनंदी तर तुरुंगात मी सुखी’ : आत्मसमर्पणापूर्वी केजरीवालांची पोस्ट
‘तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. तुरुंगात तुम्हा सर्वांची मला काळजी वाटेल. तुम्ही आनंदी असाल तर तुमचे केजरीवाल तुरुंगातही सुखी होतील’, अशा शब्दांमध्ये तुरुंगातील आतम्तसमर्पणापूर्वी केजरीवालांनी पोस्ट केली.
अरविंद केजरीवाल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी 21 दिवस निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे खूप खूप आभार (Arvind Kejriwal)’.
राजघाटाबाहेर भाजपची निदर्शने
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात राजघाटाबाहेर भाजपने निदर्शने केली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्यासह भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सचदेवा म्हणाले की, ” अरविंद केजरीवाल यांनी त्यांनी त्यांच्या कार्यालयातून महात्मा गांधींचे चित्र काढून टाकले आहे. आता ते राजघाटाला भेट देत आहेत. दिल्लीतील लोक पाण्याच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत आणि इथे नाटक करत आहेत. आम्ही अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आंदोलन करू.”
#WATCH | BJP leaders including Delhi BJP chief Virendraa Sachdeva detained by police for protesting against Delhi CM Arvind Kejriwal, outside Rajghat.
Virendraa Sachdeva says “He removed Mahatma Gandhi’s portrait from his office and is now visiting Rajghat. The people of Delhi… pic.twitter.com/Yq3bW6seLn
— ANI (@ANI) June 2, 2024