Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : धमाकेदार ‘पंचायत ३’ ही वेबसीरीज २८ मे २०२४ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. ही वेबसीरीज पडद्यावर येताच चाहत्यांनी तिला भरभरून प्रतिसाद दिलाय. सध्या या वेबसीरीजमधील एकापेक्षा एक हिट कलाकारांच्या पात्राची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दरम्यान सचिवजी यांच्या भूमिकेचे सध्या जोरदार कौतुक केलं जात आहे. सचिवजीची मुख्य भूमिका अभिनेता जितेंद्र कुमार याने जबरदस्त साकारली आहे. यामुळे जाणून घेवूयात त्याच्याविषयी…
‘पंचायत ३’ ही वेबसीरीजमध्ये अभिनेत्री जितेंद्र कुमारसह अभिषेक त्रिपाठी, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मल्लिक, चंदन रॉय, सान्विका, साद बिलग्रामी, विनोद सुर्यवंशी, विशाल यादव, कुसुम शास्त्री, पंकज झा आणि गौरव सिंह या कलाकारांनी भारदस्त अभिनय साकारलाय. अभिनेता चंदन रॉय यांनी या बेवसीरीजमध्ये विकासची भूमिका केली आहे. तर जितेंद्र कुमार यांनी सचिव जीची भूमिका साकारलीय.
मुंबईत सिंपल घर…
जितेंद्र कुमार हा एक उत्तम अभिनेता आहे. वेबसीरीज आणि अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी तो ओळखला जातो. याशिवाय जितेंद्रचं मुंबईत एक सिंपल घर असून तेथे तो वास्तवास आहे. जुनं फर्निचर, चित्रपटातील काही पोस्टर्स आणि अनेक कलाकृतीने नटलेले एक साधे डिझाईन केलेलं त्याचं घर आहे. या घराबद्दल फारशी माहिती नसली तरी त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो पाहायला मिळतात.
चार महागड्या मर्सिडीज आणि आलिशान कार
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पंचायत ३’ मधील अभिनेता जितेंद्र याच्याकडे महागड्या गाड्याचं कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये ८८.१८ लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ GLS ३५0d, ८२.१० लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ ई-क्लास, ४८.४३ लाख रुपयांची टोयोटा फॉर्च्युनर आणि ४२ लाख रुपयांची आलिशान मिनी कंट्रीमॅन यांचा समावेश आहे.
‘पंचायत ३’ साठी घेतलं मानधन
रिपोर्टच्या माहितीनुसार जितेंद्र कुमारने ‘पंचायत’ च्या तिसऱ्या सीझनसाठी ५.६ लाख रुपये मानधन घेतलं आहे. तर त्याने एका भागासाठी ७० हजार रुपये घेतलं आहे. याशिवाय अभिनेत्री नीना गुप्ताने एका एपिसोडसाठी ५० हजार रुपये आणि रघुबीर यादव यांना ४० हजार रुपये मानधन घेतलं आहे.
याशिवाय जितेंद्र कुमारने ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरील पोस्टमधून चांगली कमाई केली आहे. तो सध्या ओसवाल बुक्स, बिंगो आणि इन्शुरन्स देखो यांसारख्या अनेक ब्रँडशी संबंधित आहे. जितेंद्रची अंदाजे एकूण संपत्ती ७ कोटी रुपयांच्या घरात आहे.
‘पिचर्स’ आणि ‘कोटा फॅक्टरी’ यासारख्या वेबसीरीजमध्ये त्याने काम केलं आहे. तसेच ‘शुभ मंगल सावधान’, ‘चमन बहार’, ‘या शो आणि ‘जादूगर’ आणि ‘ड्राय डे’ सारख्या चित्रपटातही तो दिसला आहे.
हेही वाचा
सरकारी नोकरीवाला नवरदेव पाहिजे असेल तर थांबा; ‘शुभ मंगल सावधान’ ट्रेलर रिलीज
Raveena Tandon : ढकलू नका; भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत रवीनाची महिलांना शिवीगाळ करत मारहाण
Tripti Sahu : ‘पंचायत ३’ फेम खुशबू भाभी आहे कोण?; खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस
View this post on Instagram
A post shared by prime video IN (@primevideoin)