पुढील ५ दिवस राज्यातील ‘या’ भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क :  यंदा मान्सून दोन दिवस आधीच (गुरुवार. दि. ३० मे) केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रात देखील पोहचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे. Weather Forecast: ‘या’ राज्यांनाही मान्सूनपूर्वचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीननुसार, पुढील ५ …
पुढील ५ दिवस राज्यातील ‘या’ भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क :  यंदा मान्सून दोन दिवस आधीच (गुरुवार. दि. ३० मे) केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रात देखील पोहचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे.
Weather Forecast: ‘या’ राज्यांनाही मान्सूनपूर्वचा इशारा
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या बुलेटीननुसार, पुढील ५ दिवस गोवासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतातील बहुतांशी राज्यांना देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याचेही भारतीय हवामान विभागाने (Weather Forecast) सांगितले आहे.

1st June: Thunderstorm accompanied with lightning, light to mod rainfall & gusty winds (40-50kmph) at isol places in districts of #Maharashtra very likely during the next 4,5 days#Konkan likely to remain hot & humid. @imdnagpur @RMC_Mumbai @ClimateImd
मेघगर्जनेसह पाऊस☔🌩 pic.twitter.com/RYUgdXL7pK
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2024

पुढील २ दिवसात मान्सून कर्नाटकात
मान्सून पुढे सक्रीय होण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे. दरम्यान पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्राचा काही भाग, लद्वीप क्षेत्र आणि केरळ, कर्नाटक आणि रायलसीमाचा काही भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, नैऋत्य बंगालचा उपसागरचा आणखी काही भागात मान्सून सक्रीय स्थिती (Weather Forecast) निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने आज (दि.२ जून) दिलेल्या बुलेटीनध्ये स्पष्ट केले आहे.

Monsoon pass 13°N/60°E,11°N/70°E Amini,Kannur,Coimbatore,Kanyakumari,8.5°N/80°E,23°N/89.5°E &Islampur.
Conditions fav further Monsoon adv in sme more parts of Arabian Sea, L’dweep area & Kerala,sme parts of Karnataka & Rayalaseema,sme more parts of Tamil Nadu,SW BoB nxt 2 days.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2024

हेही वाचा:

Southwest Monsoon: मान्सून पुढे सरकला, बंगालचा उपसागर, ईशान्य भारताचा भाग व्यापला

Monsoon Update | मान्सून केरळमध्ये दाखल, मुंबईत कधी पोहोचणार? IMD ने दिली माहिती

Monsoon 2024 | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल