एक्झिट पोलवर राहुल गांधी म्‍हणाले, “सिद्धू मुसेवाला का गाना…”

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धू मुसेवाला यांचे स्‍मरण केले.  Exit Poll 2024 इंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडताच शुक्रवारी यसायंकाळी वृत्तवाहिन्यांवरील “एक्झिट पोल”चे अंदाज प्रसारित झाले.  होऊ लागले आहेत. या सर्व एक्झिट …
एक्झिट पोलवर राहुल गांधी म्‍हणाले, “सिद्धू मुसेवाला का गाना…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी किती जागा जिंकेल? पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धू मुसेवाला यांचे स्‍मरण केले.  Exit Poll 2024
इंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडताच शुक्रवारी यसायंकाळी वृत्तवाहिन्यांवरील “एक्झिट पोल”चे अंदाज प्रसारित झाले.  होऊ लागले आहेत. या सर्व एक्झिट पोलमध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजप व एनडीए आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एक्झिट पोल संदर्भात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “हा एक्झिट पोल नाही, हा मोदींचा मीडिया पोल आहे. हा त्यांचा फँटसी पोल आहे.” इंडिया आघाडी किती जागा जिंकेल?  या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “”तुम्ही सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐकले आहे का?  २९५….” राहुल गांधी यांचे हे वाक्य सोशल मिडियावर व्हायरल होवू लागले आहे.  Exit Poll 2024
एक्झिट पोलचे असे आहेत अंदाज
रिपब्लिक भारत : पी मार्क – एनडीए ३५९, इंडिया आघाडी १५४, इतर ३०
इंडिया न्यूज : डी डायनॅमिक्स – एनडीए ३७१, इंडिया १२५, इतर ४७
रिपब्लिक भारत : मॅट्रिझ एनडीए ३५३-३६८ इंडिया – ११८-१३३, इतर – ४३-४८
टीव्ही ५ तेलुगू : एनडीए ३५९, इंडिया – १५४, इतर – ३०
जन की बात : एनडीए ३६२-३९२, इंडिया १४१-१६१, इतर १०-२०
न्यूज नेशन : एनडीए ३४२-३७८, इंडिया १५३-१६९, इतर २१-२३
एबीपी-सी वोटर्स एनडीए – ३५३-३८० इंडिया – १६२-१८२, इतर ०४-१२
दैनिक भास्कर एनडीए- २८१-३५०, इंडिया – १४५-२०१, इतर – ३३-४९
“एक्झिट पोल” नेमके काय?
निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सर्वेक्षणाच्या आधारावर निवडणूक निकालाचा अंदाज वर्तविण्याला “एक्झिट पोल” म्हटले जाते. मतदान करून आलेल्या मतदारांशी चर्चा करून त्यांना विचारलेल्या काही प्रश्नांच्या आधारावर निवडणूक सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला जातो. या अहवालाचे विश्लेषण करून निवडणूक निकालाचा अचूक अंदाज वर्तविला जातो. वेगवेगळ्या संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाते. मतदान पार पडताच सर्व वृत्तवाहिन्यांवर “एक्झिट पोल” चे अंदाज प्रसिद्ध केले जातात.
२०१९ मध्ये भाजप, एनडीएला अंदाजापेक्षाही जास्त यश
२०१९ लोकसभा निवडणुकीत १३ संस्थांनी “एक्झिट पोल” सर्वेक्षण केले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळेल, असा दावा करण्यात आला होता. त्यानुसार एनडीएला ३०६ जागा आणि यूपीएला १२० जागा मिळतील, असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने ३०३ जागा जिंकल्या होत्या. यूपीएला केवळ ९३ जागांवर समाधान मानावे लागले होते. कांग्रेसला फक्त ५२ जागा मिळाल्या होत्या.
२०१४ लोकसभा निवडणुकीतही आठही एक्झिट पोलमध्ये देशात मोदी लहर असून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला २८३ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. कांग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला १०५ जागा मिळणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यावेळी एनडीएने ३३६ तर भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. व युपीएला फक्त 60 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये काँग्रेसच्या ४४ जागांचा समावेश होता.
सिद्धु मुसेवालचं २९५ गाणं काय आहे?
सिद्दु मुसेवालाचं ‘२९५’ हे गाण खुप गाजलं होतं. या गाण्यातील ‘रोज कुणा ना कुणाशी वाद होताना दिसेल, धर्माच्या नावावरही वाद होताना दिसतील, सत्य बोललात तर २९५ धारा मिळेल, मुलाने प्रगती केली तर द्वेष मिळेल.’ या ओळी सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या.  आता पर्यंत हे गाणं तब्बल ५९३, १७८, ५४३ लोकांनी पाहिलं आहे.

ये एग्जिट पोल नहीं है। ये ‘मोदी-मीडिया’ पोल है।
INDIA गठबंधन की 295 सीटें आ रही हैं।
: @RahulGandhi जी pic.twitter.com/alETKjG3SO
— Congress (@INCIndia) June 2, 2024

#WATCH | Congress leader Rahul Gandhi says, “It is not exit poll, it is Modi media poll. It is his fantasy poll.”
When asked about the number of seats for INDIA alliance, he says, “Have you heard Sidhu Moose Wala’s song 295? 295.” pic.twitter.com/YLRYfM4xwW
— ANI (@ANI) June 2, 2024

हेही वाचा 

Lok Sabha Exit Poll 2024 | मतमोजणीसाठी पाचशेहून अधिक सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा
Pudhari News Exit Poll : ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकारची ‘हॅटट्रिक’! NDA ला ३५० तर इंडियाला १५० जागा
Pudhari News Exit Poll : ‘एक्झिट पोल’मध्ये मोदी सरकारची ‘हॅटट्रिक’! NDA ला ३५० तर इंडियाला १५० जागा