छ.संभाजीनगर: रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश; एकाला अटक

पैठण : पैठण तालुक्यातील दांडगा रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लाखो रुपये किमतीचे बोगस कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.१) प्रमोद वाल्मीक सातपुते याला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण पंचायत …

छ.संभाजीनगर: रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश; एकाला अटक

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण : पैठण तालुक्यातील दांडगा रांजणगाव येथे बोगस कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लाखो रुपये किमतीचे बोगस कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.१) प्रमोद वाल्मीक सातपुते याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण पंचायत समितीचे कृषी निरीक्षक रामकृष्ण अरविंद पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, पैठण तालुक्यातील दांडगा रांजणगाव येथे एका शेतात बोगस कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. यानुसार शनिवारी सायंकाळी पाचोड पोलीस ठाण्याचे सपोनि शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आंबेकर, बागवान व कृषी निरीक्षक रामकृष्ण पाटील यांच्या संयुक्त पथकाने दांडगा रांजणगाव शिवारातील प्रमोद सातपुते यांच्या शेतात सापळा लावला. यावेळी प्रमोद सातपुते हा विनापरवाना व शासन मान्यता नसलेले कापूस बियाणे विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ३० पॉकेट बोगस बियाणे जप्त केली. तर सातपुते यांने दांडगा रांजणगाव येथील दौलत पारसनाथ मंचरे यांनी १० पाकीटे ९ हजार ७०० रूपये रोखीने खरेदी केल्याचे सांगितले.
ही बोगस बियाणे परेशकुमार आश्विनभाई पटेल रा. राजकोट (गुजरात) यांच्याकडून अंजनी कुरियर्स हेडगेवार हॉस्पिटल जवळ छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने विक्रीसाठी मागविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बोगस बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. याप्रकरणी बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या राजकोट येथील व्यापारी व कुरियर चालक, पॉकेटवर नाव असलेल्या अज्ञात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर: सासूरवाडीला जाताना भीषण अपघात; दोन साडूंचा जागीच मृत्यू
छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर
छ.संभाजीनगर : भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनाच्या धडकेत दोघे गंभीर