Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भोजपुरी अभिनेता प्रदीप पांडे ‘चिंटू’ यांचा आगामी ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता प्रतिक्षा संपली असून नुकतेच ‘शुभ मंगल सावधान’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय मनोरंजक आणि समाज्यातील लग्नाच्या पैलूवर प्रकाश टाकणारा आहे. यामुळे चित्रपटाची आतुरतेने चाहते वाट पाहत आहेत.
अभिनेता प्रदीप पांडे यांचा आगामी ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूब चॅनलवर नुकताच निर्मात्यांनी रिलीज केला आहे. ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाच्या ट्रेलरची कथा एका बेरोजगार तरूणापासून सुरू होते, या तरूणाला नोकरी नसल्याने तो सतत चिंतेत असतो. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी नोकरी करणाऱ्या एका मुलीशी हुंडा देऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात आणि लग्न लावून देतात. यानंतर चित्रपटाची कथा खूपच मजेदार आणि रंजक बनते हे दाखविले आहे.
पहिल्यादा २० लाख रूपये देवून दोघांचे लग्न होते. यानंतर ही घटना त्या मुलीला समजल्यानंतर दोघांच्या परिवारात वाद होतो आणि दोघांच्या घटस्फोटोपर्यत हे प्रकरण पोहोचते. तर दुसरीकडे तिच्यावर फसकणुकीची गुन्हा नोंद हनो. याचदरम्यान तिचा हातपात करण्याचा प्रयत्न होतो. यावेळी तिच्यासोबत तिचा पती असतो. नंतर दोघांच्यात प्रेम होत. असे दाखविण्यात आलं आहे.
या ट्रेलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना खूपच आवडला आहे. या चित्रपटात प्रदीपसोबत अभिनेत्री संयोगिता हिची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे, तर अभिनेत्री यामिनी सिंह देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाचे निर्माते व्हिक्टर राघव (विकी) आणि संदीप छारी आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित कुमार सिंग यांनी केलं आहे.
प्रदीप पांडे आणि अभिनेत्री संयोगितासोबत या चित्रपटात आस्था सिंह, देव सिंह, ब्रिजेश त्रिपाठी आणि लोटा तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा वीरू ठाकूर यांनी लिहिली असून या चित्रपटाला झा, छोटे बाबा आणि प्रकाश बरूड यांनी सुंदर संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी प्यारेलाल कवी जी, राकेश निराला, उमा लाल यादव, प्रकाश बरूड आणि छोटू यादव यांनी संगीतबद्ध केले आहेत. नृत्यदिग्दर्शन कनू मुखर्जी यांनी केले आहे. सहयोगी दिग्दर्शक राहुल द्विवेदी आहेत आणि कार्यकारी निर्माता प्रशांत द्विवेदी आहेत.
हेही वाचा
Raveena Tandon : ढकलू नका; भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत रवीनाची महिलांना शिवीगाळ करत मारहाण
रोमँटिक कॉमेडी “शुभ मंगल सावधान” ची अफलातून 6 वर्ष
Vanita Kharat Wedding Pics: साथिया म्हणत वनिता खरातचे ‘शुभमंगल सावधान’