भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत रवीनाची महिलांना शिवीगाळ करत मारहाण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने काल शनिवारी रात्री उशिराने तीन महिलांना जोरचा धक्का दिला. यानंतर तीन महिलांना तिला जाब विचारला असता तिने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे परिसरात घडली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी रविीना आणि तिच्या कार ड्राइव्हर भोवती गर्दी केल्याचेही दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या कार ड्राइव्हरने मुंबईतील रिझवी कॉलेजजवळील कार्टर रोडवर तीन महिलांना जोराचा धक्का दिला. या घटनेनंतर त्या महिलांनी आणि तेथील स्ठानक नागरिकांनी तिला जाब विचारण्यासाठी खूपच गर्दी केली. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत कारमधून बाहेर आली आणि त्या महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान रवीनाने तेथील नागरिकांना ‘या घटनेचा व्हिडिओ काढू नका’, ‘ढकलू नका’, ‘कृपया मला मारू नका’. असेही म्हटलं आहे. तर कारने धक्का दिलेल्या महिलांनी “तुला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येतंय” असेही म्हटलं आहे.
मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने म्हटलं आहे की, “माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची कारने धक्का दिला. सुरूवातीला ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर येत माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे. आई आणि भाचीसह खार पोलीस ठाण्यात चार तास थांबल्यावर सुद्धा पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नव्हती.”
या घटनेनंतर रवीना काही वेळाने तिच्या घरी गेली आणि तिच्या पती प्रसिद्ध ड्रिस्ट्रीब्युटर अनिल थंडानीसोबत पोलिस स्टेशनमध्ये आली. यानंतर या घटनेविषयी त्या महिलांच्या कुटुंबीयांशी बोलून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रवीनाने कोणताही तिची प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान कार पार्कींग करताना महिलांना जोराचा धक्का लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा
Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)
Raveena Tandon Padma Shri Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन अभिनेत्री रवीना टंडनचा सन्मान
Raveena Tandon : ‘मोतीबिंदूचे ऑपरेशन करा’
Allegations of Assault by #RaveenaTandon & her driver on elderly Woman Incident near Rizvi law college, family Claims that @TandonRaveena was under influence of Alcohol, women have got head injuries, Family is at Khar Police station @MumbaiPolice @CPMumbaiPolice @mieknathshinde pic.twitter.com/eZ0YQxvW3g
— Mohsin shaikh 🇮🇳 (@mohsinofficail) June 1, 2024