नाशिक : देवळ्यात शेतकऱ्याचे घर आगीत खाक
देवळा (जि. नाशिक): Bharat Live News Media वृत्तसेवा – देवळा-विठेवाड़ी रोड लगत शेतात असलेल्या एका बंद घराला शनिवारी (दि. १) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनेत जीवितहानी झाली नाही.
देवळा येथील अरुण खरोटे यांचे देवळा-विठेवाडी रोडवरील शेतात असलेल्या घराला दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. या घरात खरोटे यांचे शेती अवजार तसेच अन्य सामान ठेवलेले होते. घरातून धूर निघत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यावर याची खरोटे यांना कल्पना दिली . खरोटे यांनी लागलीच देवळा नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व सामान जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु प्रचंड नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शिलावट, रवि अहिरे, नानु देवरे, सुदाम पवार, रवि चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा:
मस्क यांचा सामना करीत चीन सोडणार दहा हजार सॅटेलाईटस्
‘नासा’ बनवत आहे चंद्रासाठीचे घड्याळ