अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे. Voting …

अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांतील ५७ जागांसाठी मतदान सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यात आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांत आज (दि.१) मतदान होत आहे. सकाळी ७ वा. पासून मतदान सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात १० कोटी ६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये ५ कोटी २४ लाख पुरुष आणि ४ कोटी २८ लाख महिला मतदारांचा समावेश आहे.

Voting for the seventh – the last – phase of #LokSabhaElections2024 begins. Polling being held in 57 constituencies across 8 states and Union Territories (UTs) today.
Simultaneous polling being held in 42 Assembly constituencies in Odisha. pic.twitter.com/BkcIZxkmYC
— ANI (@ANI) June 1, 2024

अखेरच्या टप्प्यात पंजाब आणि उत्तर प्रदेशातील सर्वाधिक १३ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पश्चिम बंगाल ९, बिहार ८, ओडिशा ६, हिमाचल प्रदेश ४, झारखंड ३ व चंदीगडमधील एका जागेवर मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणूक निकाल लागणार आहे.
मतदान पार पडताच सगळ्यांच्या नजरा एक्झिट पोलकडे लागणार आहेत. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ३ केंद्रीय मंत्र्यांचे नशीब ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मोदी हे वाराणसी मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय चंदौली येथून, अनुप्रिया पटेल मिर्झापूरमधून आणि राज्यमंत्री पंकज चौधरी महाराजगंज मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा : 

इंडिया आघाडीची ‘एनडीए’तील पक्षांना ओढण्याची रणनीती
केजरीवाल म्हणाले, ‘परवा मी आत्मसमर्पण करेन…