रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य; कार्यक्रमावर पोलिसांचा छापा

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिंगोरे गावाजवळील माळशेज अ‍ॅग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथे पोलिसांनी छापा टाकून 17 तरुण, 11 तरुणी आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापकास ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 मे) रात्री 11 च्या सुमारास करण्यात आली. दहशतवादविरोधी पुणे ग्रामीण …

रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य; कार्यक्रमावर पोलिसांचा छापा

ओतूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिंगोरे गावाजवळील माळशेज अ‍ॅग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथे पोलिसांनी छापा टाकून 17 तरुण, 11 तरुणी आणि रिसॉर्टच्या व्यवस्थापकास ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि. 30 मे) रात्री 11 च्या सुमारास करण्यात आली. दहशतवादविरोधी पुणे ग्रामीण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या पथकास माळशेज अ‍ॅग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्यांचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना कळविल्यानंतर त्यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकासह रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. या
वेळी नाशिक जिल्ह्यातील 17 तरुण तसेच  पुणे व इतर जिल्ह्यातील 11 तरुणी डीजेच्या तालावर अश्लील नृत्य करताना आढळून आले. या सर्वांसह रिसॉर्टच्या व्यवस्थापकास ताब्यात घेत ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी माळशेज अ‍ॅग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टचे मालक प्रदीप डहाळे (रा. मुंबई) यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे हे करीत आहेत.
हेही वाचा

करिअरची दिशा ठरवणार्‍या ‘एज्यु दिशा’ प्रदर्शनाचे आज उद्घाटन
बीड : 20 हजार रूपयांची लाच घेताना कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
नांदेड : भोकर येथे हायवा-दुचाकी अपघातात दोघे ठार