रूफ टॉपवरील हॉटेलवर हातोडा; पौड रोड परिसरात महापालिकेची कारवाई

रूफ टॉपवरील हॉटेलवर हातोडा; पौड रोड परिसरात महापालिकेची कारवाई

पौड रोड : Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याणीनगर येथे घडलेल्या अपघातानंतर आता महापालिका प्रशासनास रूफ टॉप हॉटेल स्पष्ट दिसू लागली आहेत. शहराच्या विविध भागांतील रूफ टॉप हॉटेलवर बांधकाम विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पौड रोड परिसरातील रूफ टॉप हॉटेल आणि अनधिकृत पत्राशेडवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. शिवतीर्थनगर येथील माथवड चौकातील हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाइस गार्डन , कोरियंडेर लीफ रेस्टोरंट, हॉटेल टेस्टी बेस्टीयावर कारवाई करण्यात आली.
त्यात रामबाग कॉलनीतील बारबेरीला गेल्या 25 मे राजी नोटीस दिली होती. त्यामुळे त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले. यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे बांधकाम विभाग झोन क्रमांक सहाचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांनी सांगितले.
जेसीबी, दोन गॅसकटर, ब्रेकर आणि दहा अतिक्रमण कर्मचार्‍यांच्या साहाय्याने बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर, शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअभियंता श्रीकांत गायकवाड, कनिष्ठ अभियंता मनोजकुमार मते, सागर शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा

महावितरणच्या सूचनेला पालिकेची केराची टोपली; काय आहे सूचना?
Nashik Crime News Update : पेठरोड कर्णनगरला युवकाचा खून; संशयित ताब्यात
दापसरे-कुर्तवडीला माडासह वनौषधींचे वरदान; शिवकालीन ठेवा जतन