भर कार्यक्रमात नंदामुरीने दिला धक्का; ‘ही’ अभिनेत्री पडता-पडता..

भर कार्यक्रमात नंदामुरीने दिला धक्का; ‘ही’ अभिनेत्री पडता-पडता..

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : साऊथचा सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण नुकतेच एका भर कार्यक्रमात अभिनेत्री आणि कोस्टारला धक्का दिल्याने चर्चेत आला आहे. याच दरम्यान धक्का दिलेली अभिनेत्री अंजली मात्र, स्टेजवर पडता-पडता वाचली आहे. यामुळे एकिकडे नंदामुरी बालकृष्ण याला त्याच्या असा वागण्यामुळे सोशल मीडियावर जोरादार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे नुकतेच अभिनेत्री अंजलीने एक ट्विट करत बालकृष्ण याचे आभार मानले आहे. यामुळे अंजलीवर देखील कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे.
सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण याच्याविषयी ‘हे’ माहित आहे काय?

 नंदामुरी बालकृष्ण यांचा आगामी ‘गँग्स ऑफ गोदावरी’ चित्रपट येत आहे.
 नंदामुरी बालकृष्णने अभिनेत्री अंजली हिला भर कार्यक्रमात धक्का दिला
 नंदामुरी बालकृष्णला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांनी नुकतेच त्याच्या आगामी ‘गँग्स ऑफ गोदावरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात नंदामुरीने अभिनेत्री अंजलीला धक्का मारला. फोटो काढण्यासाठी स्टेजवर सर्वजण मागे- मागे सरकत होते. याच दरम्यान मागे सरकण्यासाठी त्यांनी अचानक अंजलीला धक्का दिला. मात्र, अंजली यावेळी पडता- पडता वाचली आणि जोरजोरात हसू लागली. यावेळी अंजलीने साडी परिधान करत असल्याने ती हळू -हळू चालत होती. हा व्हिडिओ जोदार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात विश्वक सेन आणि नेहा शेट्टी देखील उपस्थित होते.
नंदामुरी बालकृष्ण याच्यावर नेटकऱ्यांनी कॉमेन्टचा पाउस पाडलाय. दरम्यान एका युजर्सने लिहिले आहे की, ‘अहो, थोडीतरी लाज बाळगा…’ दुसऱ्याने लिहिले की, ‘सर्वात वाईट माणूस… ”दुर्दैवाने, अभिनेत्रींना संधी गमावण्याच्या भीतीने हसावे लागते’. तिसऱ्याने लिहिले की, ‘तो किती गर्विष्ठ व्यक्ती आहे हे खूप अपमानास्पद आहे.’ यासोबत त्याला काही नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं आहे.
या घटनेनंतर अंजलीने एक टविट्‌ करत नंदामुरी बालकृष्णलचे आभार मानत त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची तयारी असल्याचे म्हटलं आहे. यामुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. यामुळे अंजलीला पुढील चित्रपटासाठीची संधी मिळावी यासाठी तिने असे केलं आहे असे सांगत ट्रोल केलं जात आहे.
‘गँग्स ऑफ गोदावरी’ च्या प्री-रिलीज इव्हेंटला उपस्थित राहिल्याबद्दल मी नंदामुरी बालकृष्ण यांचे आभार मानू इच्छिते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, नंदामुरी बाळकृष्ण आणि मी नेहमीच एकमेकांबद्दल आदर राखला आहे आणि आमच्यात खूप दिवसांपासून चांगली मैत्री आहे. त्याच्यासोबत पुन्हा स्टेज शेअर करणे खूप छान वाटले. असे तिने टविट्मध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा 

Donald Trump: पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी
करण जोहरने बर्थडेला फॅन्सना दिली मोठी भेट, नव्या चित्रपटासह…
Student of the Year : करण जोहरची मोठी घोषणा; आता ‘स्टूडंट ऑफ द इयर ३’ बनणार वेबसिरीज

pic.twitter.com/D5LXzUHRB1
— Out of Context Telugu (@OutOfContextTel) May 29, 2024

I want to thank Balakrishna Garu for gracing the Gangs of Godavari pre-release event with his presence.
I would like to express that Balakrishna garu and I have always maintained mutual respect for eachother and We share a great friendship from a long time. It was wonderful to… pic.twitter.com/mMOOqGcch2
— Anjali (@yoursanjali) May 30, 2024