Crime news : व्यसनाच्या आहारी गेल्याने दागिन्यांसाठी केला खून
माळशेज/ओतूर : पुढारी वृत्तसेवा : उदापूर (ता. जुन्नर) येथील ६१ वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करून आरोपीस गजाआड करण्यात टोकावडे (ता. मुरबाड, जि. ठाणे) पोलिसांना यश आले. आरोपी हा व्यसन व जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याने खून झालेल्या व्यक्तीकडील ३ तोळ्यांची सोनसाखळी व ४ अंगठ्या मिळवण्याकरिता हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अशोक लक्ष्मण चौधरी (वय ६१, रा. उदापूर, ता. जुन्नर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर संदीप धनाजी पवार (वय ३२, रा. गणेशपूर, पो. मिल्हे, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी धनाजी मालु पवार यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
टोकावडे पोलिस ठाण्यांतर्गत असणाऱ्या मु. गणेशपूर पो. मिल्हे गावच्या शिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच टोकावडे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी मृतदेहावर ज्वलनशील पदार्थ टाकून तो पेटवून देण्याच्या उद्देशाने भाताच्या पेंढ्यांत झाकून ठेवला होता. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंतर मृताची ओळख पटवण्यात आली असता ते अशोक चौधरी असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीची तपासणी केली असता संशयित म्हणून संदीप पवारला ताब्यात घेतले.
तो ठाणे शहर हद्दीमध्ये डोंबिवली तसेच विठ्ठलवाडी परिसरामध्ये लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस त्या ठिकाणी दाखल होत सलग ६ दिवस पाठलाग करत होते. अखेर उल्हासनगर येथील के. के. रॉयल रेसिडेन्सी येथून पवारच्या मुसक्या आवळल्या. पवार हा मृत चौधरी यांच्या नातेवाइकांशी मोबाईलद्वारे व्हाॅट्सॲप चॅटद्वारे तो जिवंत असून, त्याला पैशांची गरज आहे, असे भासवून पैसे उकळण्याच्या तयारीत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पवारला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सहायक पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक संसारे, हवालदार घाग, हवालदार आहिरे, पोलिस मित्र राजू पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हेही वाचा :
पोषण आहारात अंडी नकोच ; जैन समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा
मुळा-भंडारदर्याला अवकाळीचा दिलासा ; नगर-नाशिकचे पाऊण टीएमसी पाणी वाचणार
The post Crime news : व्यसनाच्या आहारी गेल्याने दागिन्यांसाठी केला खून appeared first on पुढारी.
माळशेज/ओतूर : पुढारी वृत्तसेवा : उदापूर (ता. जुन्नर) येथील ६१ वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करून आरोपीस गजाआड करण्यात टोकावडे (ता. मुरबाड, जि. ठाणे) पोलिसांना यश आले. आरोपी हा व्यसन व जुगाराच्या आहारी गेला होता. त्यामुळे त्याने खून झालेल्या व्यक्तीकडील ३ तोळ्यांची सोनसाखळी व ४ अंगठ्या मिळवण्याकरिता हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अशोक लक्ष्मण …
The post Crime news : व्यसनाच्या आहारी गेल्याने दागिन्यांसाठी केला खून appeared first on पुढारी.