विल्यम्‍सनचे विक्रमी 29 वे शतक, कोहली-ब्रॅडमनशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson Century : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्‍सनने शानदार शतक झळकावून धमाका केला. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले. येथील पहिल्‍या कसोटी सामन्‍यात बांगलादेशने पहिल्‍या डावात सर्वबाद 310 धावांचा डोंगर रचल्‍यानंतर प्रत्‍युत्तरात न्‍यूझीलंडने बुधवारी दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 266 धावांपर्यंत मजल मारली. केन … The post विल्यम्‍सनचे विक्रमी 29 वे शतक, कोहली-ब्रॅडमनशी केली बरोबरी appeared first on पुढारी.
#image_title

विल्यम्‍सनचे विक्रमी 29 वे शतक, कोहली-ब्रॅडमनशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson Century : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्‍सनने शानदार शतक झळकावून धमाका केला. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले. येथील पहिल्‍या कसोटी सामन्‍यात बांगलादेशने पहिल्‍या डावात सर्वबाद 310 धावांचा डोंगर रचल्‍यानंतर प्रत्‍युत्तरात न्‍यूझीलंडने बुधवारी दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 266 धावांपर्यंत मजल मारली. केन विल्‍यम्‍सनने यावेळी 205 चेंडूत 11 चौकारांसह 104 धावांचे योगदान दिले. या सामन्यात किवी संघाला सातत्‍याने धक्‍के बसत गेले. पण विल्यमसनने एक बाजू सांभाळत खेळपट्‍टीवर जणू पाया रोवला आणि 189 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या संयमी खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले.

Virat Kohli Break : विराट कोहलीने घेतला ब्रेक! आता थेट द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळणार
IND vs AUS T20 : पराभवासाठी ‘दव’ जबाबदार! ऋतुराज गायकवाडकडून गोलंदाजांची पाठराखण

न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर 44 धावांवर बाद झाले. अशा स्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल्यम्‍सनने संयम व आक्रमणाचा उत्तम मिलाफ साधला. त्याने आपल्या शानदार खेळीत 11 चौकार मारले आणि यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 50 पेक्षा जास्त होता. त्याने हेन्री निकोल्ससोबत 54 , तसेच डॅरिल मिशेलसोबत 66 धावा जोडल्या. तसेच ग्लेन फिलिप्ससोबत 50 हून अधिक धावांची भागीदारीही केली.

Rahul Dravid | राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम, BCCI ने करार वाढवला

विल्यम्‍सनच्‍या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके जमा झाली आहेत. यासह त्याने मायकेल क्लार्क (28) आणि हाशिम आमला (28) यांना मागे टाकले तर ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (29) आणि टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (29*) यांची बरोबरी केली आहे. तूर्तास, कसोटी क्रिकेटमध्‍ये सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटीत सर्वाधिक (51) शतके आहेत.
सलग चौथे कसोटी शतक (Kane Williamson Century)
विल्यम्‍सनने सलग चौथ्या कसोटीत 100 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध 132 धावांची इनिंग खेळली होती. यानंतर त्याने मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध 121 आणि 215 धावा केल्या होत्या आणि आता त्याने बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले आहे. तसेच सलग 3 कसोटीत शतके झळकावणारा तो किवी संघाचा पहिला फलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडसाठी सर्वाधिक शतके (Kane Williamson Century)
विल्यमसन हा न्यूझीलंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर निवृत्ती घेतलेला रॉस टेलर आहे, ज्याच्या नावावर कसोटी कारकिर्दीत 19 शतके आहेत. तिसऱ्या स्थानावर माजी किवी फलंदाज मार्टिन क्रो आहे. त्याने 17 कसोटी शतके झळकावली आहेत.
विल्यमसनची कसोटी कारकीर्द
विल्यमसनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना 2010 मध्ये भारताविरुद्ध खेळला. त्याने आपल्या संघासाठी 95 सामने खेळले आहेत आणि 165 डावांमध्ये 55 पेक्षा जास्त सरासरीने 8,000 हून अधिक धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 6 द्विशतके, 29 शतके, 33 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 251 आहे, जी त्याने भारताविरुद्ध साकारली होती.
संक्षिप्‍त धावफलक
बांगलादेश पहिला डाव : सर्वबाद 310. न्‍यूझीलंड पहिला डाव : 84 षटकात 8 बाद 266. (केन विल्‍यम्‍सन 205 चेंडूत 104, ग्‍लेन फिलीप्‍स 42. तैजूल इस्‍लाम 30 षटकात 89 धावात 4 बळी, शोरिफूल, मेहदी, नईम हसन, मोमिनूल प्रत्‍येकी 1 बळी).
The post विल्यम्‍सनचे विक्रमी 29 वे शतक, कोहली-ब्रॅडमनशी केली बरोबरी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kane Williamson Century : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्‍सनने शानदार शतक झळकावून धमाका केला. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले. येथील पहिल्‍या कसोटी सामन्‍यात बांगलादेशने पहिल्‍या डावात सर्वबाद 310 धावांचा डोंगर रचल्‍यानंतर प्रत्‍युत्तरात न्‍यूझीलंडने बुधवारी दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 266 धावांपर्यंत मजल मारली. केन …

The post विल्यम्‍सनचे विक्रमी 29 वे शतक, कोहली-ब्रॅडमनशी केली बरोबरी appeared first on पुढारी.

Go to Source