गायनाच्या कार्यशाळेला कस्तुरींचा प्रतिसाद; ‘Bharat Live News Media’ कस्तुरी क्लबचा उपक्रम

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गीतगायन कसे करावे इथपासून ते गायनातील विविध बारकाव्यांपर्यंतचे धडे कस्तुरी सदस्यांना दैनिक ‘Bharat Live News Media’ कस्तुरी क्लब आयोजित ‘गाता रहें मेरा दिल’ या गायनाच्या कार्यशाळेत गिरवता आले आणि या कार्यशाळेला कस्तुरींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येकात दडलेल्या गायनाच्या आवडीला नवा आकार मिळाला आणि उत्साहाने गायनाबद्दलची संपूर्ण माहिती घेतली. या कार्यशाळेसह निरोगी आरोग्यासाठी कस्तुरींसाठी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले.
‘Bharat Live News Media’ कस्तुरी क्लब नेहमीच महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. महिलांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलेला वाव मिळावा, यासाठीही विविध उपक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून कस्तुरींसाठी कर्वेनगर येथील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हॉलमध्ये आरोग्य शिबिरासह ही गायनाची कार्यशाळा घेण्यात आली. कस्तुरींना या कार्यशाळेतून गायनविश्वातील विविध गोष्टी जाणून घेता आल्या. माईक कसा धरावा, गाण्याचे स्वर म्हणजे काय, कराओके गायनाची टेक्निक आणि सादरीकरण कसे करावे, याचे प्रशिक्षण गायिका श्रद्धा गायकवाड आणि पल्लवी प्रसन्न यांनी कस्तुरींना दिले.
निरोगी आरोग्याकरिता
कस्तुरींची आरोग्य तपासणी करण्यात आली. सविता जाधव, जहाँआरा मकानदार, अनिता भोसले यांनी आरोग्य तपासणी केली. या कार्यक्रमासाठी शशिकला मेंगडे, संजीवनी उन्हाळे, शिल्पा पोळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
हेही वाचा
मेट्रोसाठी गणेशखिंड वाहतुकीत बदल : पीएमपीएल बसचे मार्गही बदलले
दारूच्या बिलावरून सोरतापवाडीत राडा
Sassoon hospital : डॉ. तावरेला सुरुवातीपासूनच आर्थिक लाभाचा ‘संसर्ग’
