म्हाडाच्या घरांसाठी अर्जास पुन्हा मुदतवाढ!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत (30 मे) असलेली मुदत आता 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली असून नागरिकांना अर्ज करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ असणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. पुणे मंडळाची मार्च महिन्यात 4 हजार 877 …

म्हाडाच्या घरांसाठी अर्जास पुन्हा मुदतवाढ!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) पुणे मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत (30 मे) असलेली मुदत आता 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली असून नागरिकांना अर्ज करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ असणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी दिली. पुणे मंडळाची मार्च महिन्यात 4 हजार 877 सदनिकांची सोडत म्हाडाने जाहीर केली. त्या दरम्यान लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली, तरीही इच्छुकांकडून घरांसाठी नोंदणी सुरू राहिली.
घरांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत. ऑनलाइनद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. निवडणुकांमुळे अर्ज करूनही अनेकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. यामुळेच मुदतवाढीची यापूर्वी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार मुदतवाढ देण्यात आली. म्हाडांतर्गत पुणे विभागाने काढलेल्या सोडतीत चार हजार 877 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात पीएमएवाय, म्हाडाच्या विविध योजनातील सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजना, म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणार्‍यास प्राधान्य, खासगी तत्त्वावरील योजनेंतर्गत अशा सदनिका विक्रीसाठी ठेवल्या आहेत.
हेही वाचा

दारूच्या बिलावरून सोरतापवाडीत राडा
पंतप्रधान मोदींची दुसऱ्या दिवशही विवेकानंद शिलेवर ध्यानधारणा; पहा व्हिडीओ
Sassoon hospital : डॉ. तावरेला सुरुवातीपासूनच आर्थिक लाभाचा ‘संसर्ग’