…तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती: अनिल देशमुख

अकोला, पुढारी वृत्तसेवा : भाजपसोबत समझौता केला असता, तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती. त्यावेळी तसे केले असते, तर आज मी मंत्रिमंडळात मंत्री असतो, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. … The post …तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती: अनिल देशमुख appeared first on पुढारी.
#image_title

…तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती: अनिल देशमुख

अकोला, पुढारी वृत्तसेवा : भाजपसोबत समझौता केला असता, तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती. त्यावेळी तसे केले असते, तर आज मी मंत्रिमंडळात मंत्री असतो, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. Anil Deshmukh
राज्यातील महायुतीचे सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. दोघेही अजित पवारांना सुनियोजितपणे ‘साइड ट्रॅक’ करीत असल्याचा आरोप देशमुख यांनी यावेळी केला. Anil Deshmukh
महायुतीमध्ये अजित पवारांचे खच्चीकरण सुरू आहे. प्रत्येक निर्णयाच्या वेळी अजित पवार यांना हे दोन्ही नेते एका बाजूला का काढतात असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी अलीकडेच अजित पवार यांनी दिल्ली दौरा केला. अचानक ते दिल्लीला गेल्याने नेमके काय चालले असेल, याचा अंदाज केला जाऊ शकतो, असे देशमुख म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकाने समितीची नेमणूक केली आहे. दुसरीकडे सरकामधीलच मंत्री छगन भुजबळ आक्षेप घेतात, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे देशमुख यांनी यावेळी म्हटले. यावरून मंत्रिमंडळातच एकवाक्यता नाही, असे सिद्ध होते. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप १२ डिसेंबररोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा 

Nashik Heavy Rain : आठवडाभरात नुकसानीचा अहवाल सादर करा! मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना
ओबीसीच्या बैठकीत विरोधकांना का डावलले? अनिल देशमुख यांचा सवाल
लाठीमार आदेश गृह मंत्रालयातूनच; अनिल देशमुख आरोपावर ठाम

The post …तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती: अनिल देशमुख appeared first on पुढारी.

अकोला, पुढारी वृत्तसेवा : भाजपसोबत समझौता केला असता, तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती. त्यावेळी तसे केले असते, तर आज मी मंत्रिमंडळात मंत्री असतो, असा गौप्यस्फोट माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला. विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते. …

The post …तर माझी तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती: अनिल देशमुख appeared first on पुढारी.

Go to Source