तुमचा कसा भंग करतो ते बघा! आ. रवींद्र धंगेकर
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकार्यांवर हप्ते वसूल केल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी धंगेकरांवर हक्क भंगाची नोटीस पाठवू, असे सांगितलंय, त्यावर माझ्यावर हक्क भंग आणलात तर तुमचा कसा भंग करतो ते पाहा, असा इशारा धंगेकरांनी मंत्री शंभूराज देसाई यांना दिला आहे. पुण्यात गुरुवारी (दि.30) पत्रकारांशी धंगेकर यांनी संवाद साधला. धंगेकर म्हणाले, मी पब संस्कृतीबाबत वस्तुस्थिती मांडली आहे, जे लोक या पब संस्कृतीला बढावा देत आहेत, अशा लोकांवर मंत्री शंभूराजे देसाई यांनी कारवाई करायला पाहिजे.
मी जे काही बोललो आहे ते जर त्यांना चुकीचे वाटत असेल तर त्यांनी हे सिद्ध करावे आणि माझ्यावर हक्क भंगाची कारवाई करावी. माझे पुणे सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी माझ्यावर कारवाई केली तर मी शिक्षा भोगायला तयार असल्याचे या वेळी धंगेकर म्हणाले. शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या निमित्ताने गृह राज्य उत्पादन शुल्क आरोग्य किंवा वैद्यकीय खात्याची जी सगळी अब्रू चव्हाट्यावर आली आहे ती अगोदर सांभाळावी, त्यानंतर मग दावे ठोकण्याची भाषा करा, असा टोला देसाई यांना सोशल मीडियावरून लगावला आहे.
हेही वाचा
चीनमध्ये सापडल्या डायनासोरच्या पावलांच्या खुणा
यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यात गर्दीवर अंकुश
तडका : आली समीप घटिका