मोठी बातमी | प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावर अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अत्याचार आणि लैंगिक छळ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवण्णा याला अखेर एसआयटीने अटक केली आहे. गुरूवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला जर्मनीतील म्युनिक येथून बेंगळुरू विमानतळावर पोहोचताच अटक केली. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर २७ एप्रिल रोजी लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तो परदेशात गेला …

मोठी बातमी | प्रज्वल रेवण्णाला बंगळुरु विमानतळावर अटक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अत्याचार आणि लैंगिक छळ प्रकरणात खासदार प्रज्वल रेवण्णा याला अखेर एसआयटीने अटक केली आहे. गुरूवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला जर्मनीतील म्युनिक येथून बेंगळुरू विमानतळावर पोहोचताच अटक केली. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावर २७ एप्रिल रोजी लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तो परदेशात गेला होता.
प्रज्वल रेवण्णा याने जर्मनीतून म्युनिक विमातळावरुन लुफ्थांसा एअरलाइनचे बिझनेस क्लासचे तिकीट बुक केले होते. तिकीट बुक करताना रेवन्नाने त्याचा संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी शेअर केला नव्हता. तो विमानात चढत असताना त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एसआयटीने आधीच एअरलाइन आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधला होता. एसआयटी बंगळुरू विमानतळावर त्याला अटक करण्यासाठी आधीच सज्ज होती. जर्मनीतून भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी दुपारी ३.३५ वाजता विमान निघाले होते. शुक्रवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्यरात्री १२.४९ वाजता विमान बंगळुरु विमानतळावर पोहचले. विमानतळावर पोहचताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला एसआयटीकडे सुपूर्द केले. अटकेनंतर एसआयटी प्रज्ज्वल रेवण्णासोबत बेंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात पोहोचले. येथून रेवण्णाला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे.