अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा भाजपचा डाव, आपचा आरोप
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मंत्री अतिशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
अतिशी म्हणाल्या की, केजरीवाल यांनी वैद्यकीय आधारावर न्यायालयात जामीनासाठी दाखल केलेल्या अर्जाला ईडीकडून केला जाणारा विरोध हा केजरीवाल यांना जीवे मारण्याचा भाजपचा डाव आहे. तिहार तुरुंगात असताना यापूर्वी केजरीवाल यांना इन्सुलिन दिले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.