‘ख्वाडा’ फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता नव्या भूमिकेत दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ख्वाडा’ फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता नव्या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं ‘रौंदळ’ चित्रपटामधील अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला …
‘ख्वाडा’ फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता नव्या भूमिकेत दिसणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘ख्वाडा’ फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आता नव्या चित्रपटात दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्ये नायक साकारत अवघ्या देशातील रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘बबन’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये डॅशिंग भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेबचं ‘रौंदळ’ चित्रपटामधील अ‍ॅक्शनरूप खऱ्या अर्थानं रसिकांना खिळवून ठेवणारं होतं. भाऊसाहेब आता पुन्हा एकदा अ‍ॅक्शन रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाऊसाहेबची मुख्य भूमिका असलेल्या ‘गोवर्धन’ या आगामी मराठी-हिंदी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
अधिक वाचा –

प्रतीक्षा संपली! ‘आम्ही जरांगे’ यादिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एन्टरटेन्मेंट या बॅनरअंतर्गत बाळासाहेब शिंदे आणि प्रमोद भास्कर चौधरी यांनी ‘गोवर्धन’ या चित्रपटाची निर्मिती केलीआहे. राईज बिझनेस ग्रुप चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘रौंदळ’ या बहुचर्चित चित्रपटानंतर भाऊसाहेबचा ‘गोवर्धन’ हा आगामी अ‍ॅक्शनपटही मराठीसह हिंदीतही बनवण्यात येणार आहे. दिग्दर्शक गजानन नाना पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. गजानन नाना पडोळ यांनी यापूर्वी ‘रौंदळ’चे यशस्वी दिग्दर्शन केले होते. ‘गोवर्धन’ या चित्रपटाचं नवं कोरं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.
अधिक वाचा –

सान्या मल्होत्राला ​​’मिसेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन

या पोस्टरवर गोवर्धनच्या भूमिकेत भाऊसाहेब दिसणार असल्याचं लिहिलं आहे. पोस्टरवरील भाऊचा अँग्री यंग मॅनसारखा लूक लक्ष वेधून घेतो. वासराला पाठीला बांधून खलनायकाला कंठस्नान घालण्यासाठी सज्ज झालेला नायक ‘गोवर्धन’च्या पोस्टरवर दिसतो. रक्तानं माखलेला शर्ट, कपाळाला टिळा आणि जखम, वाढलेली दाढी-मिशी, पाठीला बांधलेलं गायीचं वासरू, डाव्या हातात शस्त्र असा ‘गोवर्धन’चा लूक पोस्टरवर पाहायला मिळतो. याखेरीज दोन गायीसुद्धा पोस्टरवर आहेत.
 
अधिक वाचा –

Anant Ambani Radhika Wedding | अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहाचा मुहूर्त ठरला !

‘गोवर्धन’बाबत भाऊसाहेब म्हणाला की, या चित्रपटात पुन्हा एकदा अॅक्शन रूपात दिसणार असलो तरी हा विषय खूप वेगळा आणि संवेदनशील आहे. तुमच्या आमच्या रोजच्या सामाजिक जीवनातील मुद्दे या चित्रपटात मोठ्या धाडसाने मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या चित्रपटातील इतर कलाकारांच्या नावांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 
A post shared by bhausaheb shinde (@bhausaheb_official)