जम्मू-पूंछ महामार्गावर प्रवासी बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील जम्मू-पूंछ महामार्गावर एक प्रवासी बस रस्त्यापासून १५० मीटर खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. त्यावेळी चोकी चोरा …

जम्मू-पूंछ महामार्गावर प्रवासी बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील जम्मू-पूंछ महामार्गावर एक प्रवासी बस रस्त्यापासून १५० मीटर खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेकरूंनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील शिव खोडीकडे जात होती. त्यावेळी चोकी चोरा परिसरातील वळणावर हा अपघात झाला आणि बस सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. लोक ओरडू लागले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलीस, स्थानिक नागरिक, एसडीआरएफ, एनडीआरएफ यांच्या मदतीने तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.