मालकाच्या विरहाने श्वानाने सोडला प्राण ! पी. एन. पाटील यांच्या ब्रुनो श्वानाची मालकाला अनोखी श्रद्धांजली

मालकाच्या विरहाने श्वानाने सोडला प्राण ! पी. एन. पाटील यांच्या ब्रुनो श्वानाची मालकाला अनोखी श्रद्धांजली

एकनिष्ठ नेत्या प्रती मुक्या प्राण्याचीही एकनिष्ठता
काम करण्याची पद्धत असेल किंवा कार्यकर्त्यांना पदे देऊन त्यांना दिलेला सन्मान असेल यामुळे कार्यकर्त्यांचा एक मोठा संच असलेला वजनदार नेता म्हणून आमदार पी एन पाटील यांची जिल्ह्यात ओळख होती कार्यकर्तेही आमदार पी एन पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करत होते . पण मुख्या प्राण्यांनाही त्यांचा लळा होता याचे प्रत्यंतर आमदार पाटील यांच्या निधनानंतर मंगळवारी रात्री आले . पी एन यांचे निधन झाल्यानंतर मालकाच्या विरहाने अन्न पाणी सोडलेल्या त्यांच्या ब्रुनो या कुत्र्याने ही मालकाच्या निधनानंतर दहा दिवसातच प्राण सोडला .एकनिष्ठ नेता म्हणून वेगळी ओळख असलेल्या आपल्या मालकाप्रती अनोख्या पद्धतीने निष्ठा दाखवली .
आयुष्यभर एकाच पक्षाशी निष्ठा ठेवणाऱ्या पी एन पाटील यांच्या मुख्या श्वानाने सुद्धा आपल्या मालकाप्रती निष्ठा कशी होती याची अनुभूती दिली . आमदार पी एन पाटील यांनी २०१५ मध्ये आपल्या राजारामपुरीतील बंगल्यात गोल्डन रिट्रीवर जातीचे श्वान आणले त्याला ब्रुनो हे नाव दिले . ब्रुनोचा नेहमी बंगल्याच्या प्रशस्त हॉलमध्ये वावर आसायचा आमदार पाटील हे बाहेर जाण्यासाठी सकाळी हॉलमध्ये आले की त्यांच्या पायात ब्रुनोची घुटमळ ठरलेली असायची . आमदार पाटील यांना भेटणाऱ्या माणसांची वरदळ वाढली की पी एन त्याला एका कोपऱ्यात बसायला सांगायचे . ते गाडीत बसेपर्यंत ब्रुनो त्यांच्यासोबतच असायचा रात्री उशिरा घरी आले तरी त्यांच्या पायाशी एकदा तरी घुटमळायचा कामाचा कितीही व्याप असला तरी हा दिनक्रम कधीच चुकला नसल्याने या श्वानासोबत पी एन पाटील यांचा वेगळा लळा निर्माण झाला होता .
१९ मे रोजी पी एन पाटील घरी बाथरूम मध्ये पडल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले .त्यानंतर आपला मालक घरी दिसत नसल्याने ब्रुनो अस्वस्थ होत गेला . मालकाच्या विरोहाने त्यांने अन्न पाणी सोडले . त्याला सलाईन लावून त्याच्यावर औषध उपचार करण्यात आले . पण दहा दिवसापासून मालकाचा चेहरा दृष्टीस न पडल्याने ब्रुनोने मंगळवार दिनांक २८ रोजी रात्री मालकासाठी प्राण सोडला . पी एन यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाईल स्टेटसला ब्रुनोचे फोटो ठेवून त्याला आदरांजली वाहिली .
त्याचा मालक त्याला दिसलाच नाही
आमदार पी एन पाटील नेहमी पांढरे कपडे वापरत आसत . ब्रुनोलाही याची सवय झाली होती गेल्या दहा दिवसात मालक नजरेस पडत नसल्याने तो मान टाकून पडला होता .मात्र पांढऱ्या कपड्यातील व्यक्ती दिसतात आपले मालक असतील अशा व्याकुळ नजरेने तो मान वर करून पाहायचा .आणि निराश व्हायचा .पण त्याचा मालक त्याला अखेर दिसलाच नाही