…त्यांची भावना चांगली होती; भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे मनुस्मती दहन आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र ‘महाडला जाण्याची त्यांची भूमिका चांगली होती’ असे म्हणत आव्हाड यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. Maharashtra Politics
काय म्हणाले भुजबळ?
जितेंद्र आव्हाड यांची चांगली भूमिका होती.
त्यांची भूमिका समजून घ्या
आव्हाड विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही
काय म्हणाले छगन भूजबळ?
जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलना दरम्यान महाड येथे चवदार तळ्याजवळ मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. यावेळी अनावधानाने आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आले. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध करण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांना माध्यमांनी या प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांची महाडला जाण्याची चांगली भूमिका होती. मनुस्मृतीचे दहन करणे ही भावना होती. परंतु त्यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडलं गेले. पण त्यांनी याबदद्ल माफीही मागितली आहे. ते आमच्या विरोधी पक्षातील आहेत म्हणून टीका करण्यात काही अर्थ नाही. जितेंद्र आव्हाड यांची भूमिका समजून घेण गरजेच आहे. मनुस्मृतीचा चंचूप्रवेश नको आहे, या मुद्द्यावरून लक्ष विचलीत होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावरच लक्ष केंद्रीत होईल, असेही ते म्हणाले. Maharashtra Politics
मी भुजबळांचा मनापासून आभारी
भूजबळ यांच्या प्रतिक्रियेनंतर आव्हाड यांनी त्याचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर पोस्टमध्ये लिहीले की, “भुजबळ साहेब अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, छगन भुजबळ साहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे.” Maharashtra Politics
काय आहे प्रकरण?
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. याबरोबरच जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आले होते. विरोधकांनी आंदोलने करीत आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून माफी
दरम्यान, अनावधानाने माझ्याकडून माझ्या बाबाचा फोटो नकळत फाडला गेला, ही अत्यंत गंभीर चूक असल्याचे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तमाम नागरिकांची नतमस्तक होऊन माफी मागितली आहे. तसेच आंबेडकरी अनुयायीही मला माफ करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्यांच्या घराभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी स्वत: मनुस्मृतीचे दहन केले होते. तेव्हा सांगितले होते. मनु हा विषमत्तेचा, चातुर्वण्याचा, स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे, अशा मनुचा शालेय पुस्तकात समावेश होणे हे आम्हाला मान्य नाही. याचेच अनुकरण करत आव्हाड हे मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करत होते. ते करीत आमच्याकडून अनावधनाने मनुस्मृतीचे पुस्तक फाडले जात असताना, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो फाडला गेल्याचे दिसत आहे. ही आमची अक्षम्य चुकी आहे. त्यामुळे या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडून झालेल्या घटनेबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरीकांची लीन होऊन, नतमस्तक होऊन माफी मागतो. हे प्रकरण माझ्या हृदयाला लागले आहे. मी माझ्या आयुष्यात एकदा भुमिका घेतली की माफी मागत नाही, पण मी ज्या अर्थी माफी मागत आहे, त्या अर्थी ते मी मनापासून बोलत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करा, असे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. Maharashtra Politics
मा. भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर , आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2024
हेही वाचा
Nashik News | नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस युवासेनेतर्फे ‘जोडे मारो’, महाडच्या त्या घटनेचा निषेध
जितेंद्र आव्हाडांचे महाडमध्ये मनुस्मृती दहन आंदोलन
राजाश्रय दिलेले गुंड तुमच्या अंगावर आले, तर नवल नको: जितेंद्र आव्हाड