Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा यांच्या ‘महाराज’ या चित्रपटातून आमिर खानचा मुलगा जुनैद खानने डब्यू केला आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लूक व्हायरल झाले असून त्याच्या डेब्यूमुळे इंटरनेटवर चर्चांना उधाण आलं आहे. जुनैद खान आणि जयदीप अहलावत आहेत देखील ‘महाराज’ मध्ये दिसणार असून या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तत्पूर्वी प्रकल्पाचे वर्णन करताना सिद्धार्थ मल्होत्रा यांनी शेअर केले की, हा चित्रपट १८०० च्या दशकातील आहे.
अधिक वाचा-
‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर
यादिवशी रिलीज होणार महाराज चित्रपट
जुनेद खान व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये जयदीप अहलावत शर्वरी वाघ आणि शालिनी दिसणार आहेत प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन विपुल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी केले आहे. हा चित्रपट १४ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी आज २९ रोजी महाराजचे पोस्टर लॉन्च केले आहे. YRF Entertainment बॅनरअंतर्गत हा चित्रपट तयार होत आहे.
अधिक वाचा-
हॉट आहे शर्वरी वाघ; ‘मुंज्या’मध्ये तरस गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स