आरटीई प्रवेशाची लॉटरी 10 जूनला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 17 ते 31 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. आता अर्जांची संख्या बघून चार ते पाच दिवसांची अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. परंतु, जूनच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजेच 10 किंवा 11 जूनला प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात येणार असल्याची …

आरटीई प्रवेशाची लॉटरी 10 जूनला

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 17 ते 31 मे या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. आता अर्जांची संख्या बघून चार ते पाच दिवसांची अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. परंतु, जूनच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजेच 10 किंवा 11 जूनला प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आर्थिक दुर्बल, वंचित, आर्थिक व सामाजिकदृष्टया मागास घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा, पोलिस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानित) आणि महानगरपालिका शाळांमध्ये (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) पहिली किंवा पूर्वप्राथमिक या स्तरावर 25 टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी यापूर्वी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पुन्हा नव्याने अर्ज करावा लागणार आहे. राज्यातील 9 हजार 204 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 1 लाख 5 हजार 64 जागांवर प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळांची संख्या, उपलब्ध जागा आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडेआठपर्यंत 2 लाख 1 हजार 502 विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाले आहेत. यामध्ये पुण्यात सर्वाधिक 17 हजार 689 जागांसाठी 41 हजार 168 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई प्रवेशासाठी पुण्यात 40 हजारांवर अर्ज…
आरटीई प्रवेशासाठी पाच जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून, तर सहा जिल्ह्यांमध्ये 5 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 41 हजार 268 अर्ज आल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबाद 12 हजार 432, नागपूर 17 हजार 872, पुणे 41 हजार 268, नाशिक 12 हजार 204, ठाणे 16 हजार 504 या पाच जिल्ह्यांमध्ये 10 हजारांहून अधिक अर्ज; तर अहमदनगर 6 हजार 60, अमरावती 5 हजार 719, जळगाव 6 हजार 460, मुंबई 7 हजार 941, नांदेड 7 हजार 182, रायगड 6 हजार 297, तर सहा जिल्ह्यांमध्ये 5 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरटीई प्रवेशासाठी आलेल्या अर्जांचा अंदाज घेऊन पुढील चार ते पाच दिवस अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांवरील प्रक्रियेसाठी काही दिवस लागतील. परंतु, जून महिन्यात 10 किंवा 11 तारखेला प्रवेशाची लॉटरी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.
– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

हेही वाचा

‘गाभ’ चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर
सोने तस्करीप्रकरणी काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पीएला अटक
Nashik | विशेष पोलिस महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे