दुर्दैवी! पळसदेव येथे विषारी साप चावल्याने चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा : विषारी साप चावल्याने वैष्णवी महेश केवटे (वय 4, सध्या रा. पळसदेव शेलारपट्टा, ता. इंदापूर, मूळ रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर) हिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) मध्यरात्री घडली. कोपीमध्ये साप गेल्याचे शुक्रवारी सायंकाळी केवटे त्यांच्या घरातील अनेकांनी पाहिले होते. सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. साप निघून गेला …

दुर्दैवी! पळसदेव येथे विषारी साप चावल्याने चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पळसदेव : Bharat Live News Media वृत्तसेवा : विषारी साप चावल्याने वैष्णवी महेश केवटे (वय 4, सध्या रा. पळसदेव शेलारपट्टा, ता. इंदापूर, मूळ रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर) हिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) मध्यरात्री घडली. कोपीमध्ये साप गेल्याचे शुक्रवारी सायंकाळी केवटे त्यांच्या घरातील अनेकांनी पाहिले होते. सापाला कोपीतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. साप निघून गेला असेल, असे समजून त्यांनी तो विषय तेथेच सोडून दिला. जेवण झाल्यानंतर सगळे झोपी गेले. मध्यरात्री सापाने वैष्णवीच्या कानाचा दोन वेळा चावा घेतला.
वैष्णवी मोठ्याने रडत आईला कानाजवळ व डोक्यात मुंग्या येत असल्याचे सांगत होती, तर बहीण कानातून रक्त येत असल्याचे दाखवत होती. थोड्याच वेळात वैष्णवीला उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. वैष्णवीचे वडील मासे पकडण्यासाठी गेले होते. फोनवरून त्यांना घटनेची माहिती देताच ते घरी आले. उपचारासाठी वैष्णवीला गावातील खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
हेही वाचा

विकेंडमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची गर्दी : टोलवसुलीही जोरात
पक्ष्यांसाठी घरांच्या आवारात ठेवा पाणी; पक्षिप्रेमींचे नागरिकांना आवाहन
विद्येच्या प्रांगणात धुँआ! विद्यापीठ प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष