ब्रेकिंग! सेन्सेक्स प्रथमच ७६ हजारांवर; निफ्टी २३,१०० पार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात सोमवारी रेकॉर्डब्रेक दिसून आली. सेन्सेक्सने आज दुपारच्या व्यवहारात ५७५ अंकांनी वाढून प्रथमच ७६ हजारांचा नवा उच्चांक नोंदवला. तर निफ्टी १४० अंकांनी वाढून २३,१०० पार झाला. बाजारातील तेजीत बँकिंग आणि आयटी शेअर्स आघाडीवर आहेत. तर निफ्टीवर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी हे सर्वाधिक तेजीत आहेत.
सेन्सेक्सने आज ७५,६५५ वर सुरुवात केली होती. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात त्याने ७६ हजारांचा नवा उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, एलटी, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टीसीएस, कोटक बँक हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर विप्रो, एनटीपीसी, सन फार्मा, मारुती या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. दरम्यान, बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅप हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
निफ्टीवर डिव्हिज लॅब, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, एलटी हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर विप्रो, ओएनजीसी, ग्रासीम, आयशर मोटर्स, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी बँक १.२ टक्के, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस १.१ टक्के आणि निफ्टी आयटी सुमारे १ टक्के वाढून व्यवहार करत आहेत.
विक्रमी उच्चांकावर खुला झाल्यानंतर शेअर बाजारात काही प्रमाणात चढ-उतार दिसून आला. पण दुपारी १२ नंतर सेन्सेक्सने ७६ हजारांच्या अंकावर झेप घेतली. तर निफ्टीने पहिल्यांदाच २३,१०० चा उच्चांक नोंदवला आहे.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टूरब्रो (एल अँड टी), इन्फोसिस, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि एसबीआय यांसारख्या हेवीवेट्स शेअर्सधील खरेदीमुळे दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी उसळी घेतली.