Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी फायनलमध्ये (KKR vs SRH Final) सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. केकेआरला १० वर्षांनंतर ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यात यश आले. केकेआरच्या या विजयाचे अनेक नायक आहेत. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच संघाला सावरणारा सुनील नारायण हा या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP) ठरला आहे. आयपीएलमध्ये हा पुरस्कार तीनदा जिंकणारा सुनील नारायण पहिला खेळाडू आहे.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू असलेल्या सुनिल नारायण याने यापूर्वी आयपीएल २०१७ आणि २०१८ मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (MVP) पुरस्कार जिंकला होता. २०१२ मध्ये तो मॅन ऑफ द टूर्नामेंटही ठरला होता. या हंगामात (KKR vs SRH Final) त्याने गोलंदाजीनेच नव्हे तर आपल्या स्फोटक फलंदाजीनेही संपूर्ण हंगाम गाजवला. आयपीएल (IPL 2024) मध्ये खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये १८०.७४ च्या स्ट्राइक रेटने त्याने ४८८ धावा केल्या. आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ९ व्या क्रमांकावर आहे. १७ विकेटसह सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो ११ व्या स्थानावर आहे.
Sunil Narine becomes first player to win MVP award in IPL thrice
Read @ANI Story | https://t.co/1LFMmfGuEE#SunilNarine #KolkataKnightRiders #IPL2024 pic.twitter.com/6lkT44CHTV
— ANI Digital (@ani_digital) May 27, 2024
सामन्यात काय घडलं?
‘आयपीएल २०२४’च्या फायनलमध्ये ‘केकेआर’ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटस् आणि तब्बल ५७ चेडू राखून सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सनरायझर्सच्या अंगलट आला. स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला होता. केकेआरच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला १८.३ षटकात ११३ धावांवर रोखले होते. केकेआरने १०.३ षटकातच २ बाद ११४ धावा करून सामना जिंकला.
हेही वाचा :
१० साल बाद..! कोलकाता IPL चॅम्पियन, हैदराबादवर ८ विकेट राखून विजय
पाकिस्तानची मधली फळी कमकुवत : शाहिद आफ्रिदी
जेसन होल्डरची माघार; वेस्ट इंडिजच्या वर्ल्डकप संघात बदल