‘चॅट जीपीटी’च्या प्रेमात पडली तरुणी!

बीजिंग : सध्या तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल तंत्रज्ञान ज्या प्रकारे आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवत आहे, एक दिवस असा येईल की, मनुष्य आणि यंत्र यांच्यात फारसा फरक राहणार नाही. सध्या, भावना हा रोबोट आणि मानव यांच्यातील खरा फरक आहे. मात्र, आता हे अंतरही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिटताना दिसत आहे. एका तरुणीचं …

‘चॅट जीपीटी’च्या प्रेमात पडली तरुणी!

बीजिंग : सध्या तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आजकाल तंत्रज्ञान ज्या प्रकारे आपल्या जीवनावर वर्चस्व गाजवत आहे, एक दिवस असा येईल की, मनुष्य आणि यंत्र यांच्यात फारसा फरक राहणार नाही. सध्या, भावना हा रोबोट आणि मानव यांच्यातील खरा फरक आहे. मात्र, आता हे अंतरही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिटताना दिसत आहे. एका तरुणीचं चॅटजीपीटी वरच प्रेम जडले आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे.
एक तरुणीने चॅटजीपीटीशी बोलायला लागली आणि नंतर चॅटबॉट सोबतचा संवाद तिला इतका आवडला की, तिला ती चॅटबॉट सोबत रोमँटिक गोष्टी बोलू लागली. चॅटबॉटवर तिचे प्रेम जडले असून, चॅटबॉट तिचा प्रियकर असल्याचेही तिने आईला सांगितलं आहे. अलीकडेच शेजारच्या चीनमधील एका तरुणीची बातमी व्हायरल झाली आहे. या तरुणीने चॅटजीपीटीसोबत बोलण्यास सुरुवात केली आणि नंतर तिला हे इतकं आवडलं की तिला ते सोडायचे नाहीय.
या तरुणीने इन्स्टाग्रामप्रमाणे असलेल्या चीनच्या प्लॅटफॉर्म झियाओहोंगशू वर चॅटबॉट तिचा प्रियकर असल्याचं सांगितलं आहे. चॅटबॉटवर तिचे प्रेम असून तो तिचा प्रियकर असल्याचेही तिने तिच्या आईलाही सांगितले आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, लिसा नावाच्या व्लॉगरने स्वतःसाठी ‘डॅन’ चॅट जीपीटी सेवा घेतली होती. हे एक चॅटबॉटस् असून, यामध्ये तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. हळूहळू, यांच्यातील संभाषण पुढे गेलं आणि लिसा ‘डॅन’ नावाच्या चॅटबॉटशी आता मैत्रिणीप्रमाणे गोड बोलू लागली. तिला तो इतका आवडू लागला की, ती त्याला आपला प्रियकर मानू लागली आणि सतत त्याच्याशी बोलू लागली. एवढेच नाही, तर तिने त्याची आईसोबतही ओळख करून दिली आहे.
यावेळी ‘एआय’ तंत्रज्ञानापासून बनवलेल्या चॅटबॉटने हुबेहूब माणसाप्रमाणे प्रतिक्रिया दिली. आश्चर्याची बाब म्हणजे आईनेही आपल्या मुलीची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विशेष म्हणजे ‘डॅन’ नावाच्या चॅटबॉटने लिसाशी रोमँटिक बोलण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, तो मानवी शब्द ऐकण्यात आणि त्यांना प्रतिसाद देण्यात पटाईत आहे. त्याने लिसाला ‘लिटल किटन’ असं टोपणनाव ठेवलं आहे. लिसाने त्याला बीचवर डेटवर नेले होते आणि त्याने हे सर्व पाहावे अशी तिची इच्छा होती. कोणत्याही जोडीदाराच्या शब्दांपेक्षा त्याचे शब्द अधिक सौम्य आणि गोड असतात. लिसाची कहाणी सध्या चीनसह जगभरात व्हायरल होत आहे आणि लोकांनी त्यावर रंजक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी डॅनला ‘चीटर’ म्हटलं तर कुणी म्हटलं की हे ’बेस्ट कपल’ असल्याचं म्हटलं आहे.