तरुण वहिदा बनून सर्वांवर भारी पडली हिरामंडीची वैष्णवी गणात्रा

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिरामंडीमध्ये वैष्णवीने तरुण वहिदाची भूमिका साकारलीय. ती हमारी वाली गुडन्यूज, रक्षाबंधन, रसल अपने भाई की ढाल, वो तो है अलबेला, नागिन ६, अभय २ मध्ये दिसली होती. वैष्णवी गणात्रा एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावर २०२० मध्ये टीव्ही मालिका हमारी वाली गुड न्यूजमधून डेब्यू केलं होतं. त्याचवर्षी वैष्णवी वेब सीरीज …

तरुण वहिदा बनून सर्वांवर भारी पडली हिरामंडीची वैष्णवी गणात्रा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिरामंडीमध्ये वैष्णवीने तरुण वहिदाची भूमिका साकारलीय. ती हमारी वाली गुडन्यूज, रक्षाबंधन, रसल अपने भाई की ढाल, वो तो है अलबेला, नागिन ६, अभय २ मध्ये दिसली होती. वैष्णवी गणात्रा एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने छोट्या पडद्यावर २०२० मध्ये टीव्ही मालिका हमारी वाली गुड न्यूजमधून डेब्यू केलं होतं. त्याचवर्षी वैष्णवी वेब सीरीज अभय २ मध्येदेखील दिसली होती. वैष्णवीने तेलगु चित्रपट द घोस्ट मध्येही काम केलं आहे. सध्या ती तेरी मेरी डोरियामध्ये काम करत आहे.

तिचा जन्म १८ फेब्रुवारी २००५ रोजी गुजरातच्या राजकोटमध्ये झाला होता. आता वैष्णवी गणात्रा १८ वर्षांची आहे. ती इयत्ता अकरावीमध्ये शिकत असल्याचे तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं. तिला पुढे शिकायचं आहे आणि तिला पदवी पूर्ण करायची आहे.

अनुपम खेर यांच्या ॲक्टिंग इन्स्टीट्यूट ॲक्टर प्रिपेयर्समधून तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात २०२० मध्ये टीव्ही मालिका हमारी वाली गुड न्यूजमधून केली होती. यामध्ये तिने आंचल मिश्राची भूमिका साकारली होती. तिने २०२१ मध्ये वेब सीरीज अभय २ मधून आपला डिजिटल डेब्यू केला होता.

ती आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देते. ती सांगते की, तिची आई तिचे शूटिंग आणि अभ्यास बॅलेन्स करण्यास मदत करते. शूटिंग करताना ती स्वत:जवळ पुस्तके ठेवते. वेळ मिळाला की ती अभ्यास करते. ती एक डॉग लव्हर आहे.

अधिक वाचा – 

अभिनेत्री लैला खान हत्याकांड; सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा

Laila Khan Murder Case | 13 वर्षापूर्वी याच बंगल्यात लैला खानसह सहा जणांची झाली होती हत्या, आज झाला खंडहर
हार्दिक पांड्या-नताशा स्टॅनकोविक विभक्त होताहेत? इन्स्टावरून हटवले आडनाव

 

View this post on Instagram

 
A post shared by Vaishnavi Ganatra (@vaishnaviganatraofficial)