राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना : 71 गवे, 22 रानकोंबडे, शेकरू 5

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : तब्बल 71 गवे, 22 रानकोंबडे, 17 रानकुत्री, 5 शेकरू यासह विविध प्राणी-पक्ष्यांची नोंद कोल्हापूर वन्यजीव विभागाकडे झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत प्राण्यांची वरील आकडेवारी समोर आली आहे. निसर्गप्रेमी, पर्यटकांनाही एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे …

राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना : 71 गवे, 22 रानकोंबडे, शेकरू 5

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : तब्बल 71 गवे, 22 रानकोंबडे, 17 रानकुत्री, 5 शेकरू यासह विविध प्राणी-पक्ष्यांची नोंद कोल्हापूर वन्यजीव विभागाकडे झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे मे महिन्यातील बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात प्राणी गणना करण्यात आली. या गणनेत प्राण्यांची वरील आकडेवारी समोर आली आहे.
निसर्गप्रेमी, पर्यटकांनाही एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, त्यांचे आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव घेता आला. प्रतिवर्षी या उपक्रमास निसर्गप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वन विभागातर्फे सुरू असणारी कामे, वनसंपदा संवर्धनाचा सुरू असलेला प्रयत्न याबाबतची माहिती जवळून घेता आली.
यंदा कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे 22 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना झाली. ही प्राणी गणना राधानगरी अभयारण्य जंगलातील विविध ठिकाणी एकूण 26 पाणस्थळांवर घेण्यात आली. यात वन विभागाचे एकूण 50 अधिकारी व वन कर्मचारी आणि 26 प्रगणकांनी (स्वयंसेवक) सहभाग नोंदविला, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस. एस. पवार यांनी दिली.
साळिंदर, गेळा अन् कापूगोडाही
वन्यजीव गणनेत विविध प्रकारचे दुर्मीळ प्राणी-पक्षी व सरपटणार्‍या जीवांचे दर्शन झाले. प्राण्यांमध्ये गवा, ससा, भेकर, उदमांजर, साळिंदर, वानर, सांबर, शेकरू, गेळा, डुक्कर, रानडुक्कर, अस्वल, कासव, रानकुत्रा, मुंगूस यांचा समावेश आहे. तसेच पक्ष्यांमध्ये रानकोंबडा, वटवाघुळ, घुबड, गरुड, मोर, चिमणी, घार, कापूगोडा यांचा समावेश आहे. याशिवाय घोणस, कासव हेही प्राणी दिसले आहेत.