रोहित, विराट टी-20 मध्ये परतणार?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. परंतु, या संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे; पण आगामी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील. दक्षिण आफ्रिका हा 2023 या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा परदेशी दौरा असेल. जिथे टीम इंडियाला टी-20 मालिकेसह एकदिवसीय आणि कसोटी … The post रोहित, विराट टी-20 मध्ये परतणार? appeared first on पुढारी.
#image_title

रोहित, विराट टी-20 मध्ये परतणार?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. परंतु, या संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे; पण आगामी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील. दक्षिण आफ्रिका हा 2023 या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा परदेशी दौरा असेल. जिथे टीम इंडियाला टी-20 मालिकेसह एकदिवसीय आणि कसोटी मालिका देखील खेळायची आहे. पुढील आठवड्यात या दौर्‍यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीला 10 डिसेंबरला होणार्‍या टी-20 मालिकेपूर्वी आणि नंतर दोन मोठे निर्णय घ्यायचे आहेत. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या टी-20 मधील कारकिर्दीचा फैसलाही होणार आहे. या दोघांनी वर्ल्डकपपर्यंत टी-20 संघात खेळावे, असे निवड समितीला वाटते. (IND vs SA T20)
इनसाईड स्पोर्टस्च्या माहितीनुसार, आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघांची घोषणा एकाच वेळी केली जाईल. मात्र, भारत ‘अ’ संघाची मालिकेपर्यंत कसोटी संघाची घोषणा रोखण्यात येणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही 26 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी परतणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी इंडिया ‘अ’ संघातील काही खेळाडूंबाबतही निर्णय निवडकर्ते घेतील. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इनसाइड स्पोर्टस्ला सांगितले की, संघ निवडीबाबत सोमवारी चर्चा करण्यात येईल. या चर्चेदरम्यान अनेक गोष्टी आहेत; पण कसोटीपूर्वी आम्ही टी-20 आणि एकदिवसीय खेळणार आहोत, त्यामुळे संघ निवड ही त्याच्या आसपास करण्यात येईल. त्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या टी-20 मधील निवडीबाबतही चर्चा केली जाणार आहे. (IND vs SA T20)
टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रीत केल्यास दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना दीर्घ विश्रांती मिळू शकते. अशावेळी दोघेही कसोटी मालिकेसाठीच संघात सामील होतील. विराट आणि रोहित हे दोघेही गेल्यावर्षीच्या टी-20 विश्वचषकापासून एकही टी-20 सामना खेळलेले नाहीत. ते दोघेही टी-20 संघाबाहेर आहेत, कारण त्यांनी सर्व लक्ष वन डेकडे वळवले होते. मात्र, हे चालूच राहण्याची शक्यता आहे, कारण जूनमध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषकापूर्वी निवड समितीकडे फक्त सहा टी-20 सामने शिल्लक आहेत.
अजित आगरकर विराट-रोहितबरोबर बसून त्यांच्या टी-20 भवितव्याबाबत निर्णय घेतील. जरी दोघेही कसोटीत खेळणार हे निश्चित असले तरी, रोहित शर्मा वन डे खेळणे सुरू ठेवणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वर लक्ष केंद्रीत करताना विराट कोहली वनडे मध्ये राहू शकतो; पण तरीही हा चर्चेचा विषय आहे.
रोहित-गिल सलामी जोडी सुपरहिट
रोहित आणि विराट कोहली यांनी गेल्यावर्षीच्या ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपासून एकही ट्वेंटी-20 सामना खेळलेला नाही. 2023 च्या वन डे वर्ल्डकपची तयारी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ट्वेंटी-20 फॉरमॅटपासून दुरावा ठेवला होता. या दोघांनी वन डे वर्ल्डकप गाजवला.
रोहित 36 वर्षांचा असला तरी पॉवर-प्लेमध्ये त्याची आक्रमक फलंदाजी ट्वेंटी-20 साठी फायदेशीर ठरू शकते. अशा स्थितीत रोहित पुढील वर्षी होणारा वर्ल्डकप खेळावा, एवढाच बोर्ड आणि निवड समितीचा प्रयत्न आहे. ओपनिंगमध्ये गिल आणि रोहित पूर्णपणे सेटल झाल्याचेही बोर्डाचे मत आहे. गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग केली, तर त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही. त्यामुळे रोहितसाठी ट्वेंटी-20 वर्ल्डकप खेळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
The post रोहित, विराट टी-20 मध्ये परतणार? appeared first on पुढारी.

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. परंतु, या संघात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे; पण आगामी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतील. दक्षिण आफ्रिका हा 2023 या वर्षातील भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा परदेशी दौरा असेल. जिथे टीम इंडियाला टी-20 मालिकेसह एकदिवसीय आणि कसोटी …

The post रोहित, विराट टी-20 मध्ये परतणार? appeared first on पुढारी.

Go to Source