Uttarkashi Tunnel Rescue : नशीब करायचे घात, युक्ती द्यायची साथ! अशा आल्या अडचणी, अशी केली मात!!
समस्या : अडकलेल्या मजुरांशी संपर्क कसा साधावा? ऑक्सिजन सपोर्ट कसा द्यावा? खायला कसे द्यावे?
मात : पाण्याच्या निचर्यासाठी 5 इंचाचा पाईप बोगद्यात होता. इथे वॉकी-टॉकीला सिग्नल मिळाल्याने ही समस्या सुटली. याचा पाईपातून मग कॉम्प्रेसरच्या माध्यमातून ऑक्सिजन, चणे, शेंगदाणे, औषधे पाठविण्यात आली.
समस्या : ढिगारा तेवढाच्या तेवढा पडायचा
मात : ढिगारा उपसण्याऐवजी त्यातच मोठे भोक पाडून त्यात पाईप टाकण्याची कल्पना मग समोर आली.
समस्या : हरक्युलस विमानाने ऑगर मशिन मागविले. 25 मीटरपर्यंत पाईप टाकला गेला होता. अडचणी उद्भवल्याने पुढे 900 ऐवजी 800 मि.मी.चा पाईप टाकायला सुरुवात झाली.
समस्या : 9 दिवस उलटले, हाती काही लागले नाही.
मात : बोगद्यात मग एकाचवेळी 5 बाजूंनी ड्रिलिंग सुरू केले.
समस्या : अडकलेले मजूर खंगले, खचले.
मात : व्यवस्थित जेवण पोहोचविण्यासाठी 21 नोव्हेंबरला 6 इंची पाईप ड्रिल करण्यात यश आले आणि यातून जेवण पाठवायला सुरुवात झाली.
समस्या : 60 मीटरच्या ढिगार्यात 45 मीटरपर्यंत पाईप गेलेला होता. 6-6 मीटरचे 3 पाईप टाकायचे राहिलेले होते आणि ऑगर मशिनच्या वाटेत सळ्या आणि एक ठोस प्लेट आली. ऑगर मशिनचे पाते तुटले. काम थांबले.
मात : ‘एनडीआरएफ’चे जवान सळ्या आणि प्लेट कापायला म्हणून पाईपातून आत गेले. कटिंग सुरू केली; पण नंतर त्याचा गॅस अडकलेल्या मजुरांना आणि कटर्सना तापदायक ठरू लागला. त्याचवेळी ध्येय जवळ आल्याचेही कळले. उर्वरित खोदकाम आणि ढिगारा उपसणे मग रॅट मायनर्सनी (हँड ड्रिलिंग करणारे मजूर) पार पाडले आणि एकापाठोपाठ एक अडकलेला मजूर स्ट्रेचर व दोराच्या मदतीने पाईपमधूून बाहेर खेचण्यात आले.
The post Uttarkashi Tunnel Rescue : नशीब करायचे घात, युक्ती द्यायची साथ! अशा आल्या अडचणी, अशी केली मात!! appeared first on पुढारी.
समस्या : अडकलेल्या मजुरांशी संपर्क कसा साधावा? ऑक्सिजन सपोर्ट कसा द्यावा? खायला कसे द्यावे? मात : पाण्याच्या निचर्यासाठी 5 इंचाचा पाईप बोगद्यात होता. इथे वॉकी-टॉकीला सिग्नल मिळाल्याने ही समस्या सुटली. याचा पाईपातून मग कॉम्प्रेसरच्या माध्यमातून ऑक्सिजन, चणे, शेंगदाणे, औषधे पाठविण्यात आली. समस्या : ढिगारा तेवढाच्या तेवढा पडायचा मात : ढिगारा उपसण्याऐवजी त्यातच मोठे भोक पाडून …
The post Uttarkashi Tunnel Rescue : नशीब करायचे घात, युक्ती द्यायची साथ! अशा आल्या अडचणी, अशी केली मात!! appeared first on पुढारी.