ठाणे: कळवा- मुंब्रा येथे व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याचे वृत्त निराधार

ठाणे, Bharat Live News Media वृत्तसेवा : कल्याण लोकसभा मतदार संघातील मुंब्रा- कळवा येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT) मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली नाही.
या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही.
तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली. रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा
ठाणे: डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील १ लाखावर मतदारांची नावे गहाळ
ठाणे: बदलापुरात भरदुपारी मतदारांच्या रांगा; ज्येष्ठ नागरिक, नवमतदारांमध्ये उत्साह
ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.०५ टक्के मतदान
