..तर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : आम आदमी पक्षाला मते दिल्यास आम्ही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी (दि.२०) जनतेला दिले. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था सुधारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजधानी दिल्लीत २५ मे रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी जोरात प्रचार सुरू आहे. केजरीवाल यांनी दक्षिण दिल्लीतील ‘आप’चे उमेदवार साहीराम पहलवान यांच्या प्रचारासाठी ‘रोड शो ‘ केला. गाडीचे ‘सन रूफ’ उघडून त्यांनी जनतेला संबोधित केले.
केजरीवाल म्हणाले की, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे भाजप आणि पंतप्रधान मोदी गोंधळले आहेत. या सरकारमध्ये आपचा सहभाग राहणार आहे. आमचे सरकार आल्यास दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणार आहोत. दिल्लीची कायदा व सुव्यवस्था सुधारून दिल्लीचे जनतेसाठी काम करणारे उपराज्यपाल आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
सांगली : ‘सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांवर अन्याय करून उद्धव ठाकरेंसोबत डील’
Monsoon 2024 : आनंद वार्ता: मान्सून आला; अंदमान-निकोबार-बंगालच्या उपसागरात आगमन
