ठाणे: डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील १ लाखावर मतदारांची नावे गहाळ

कल्याण: Bharat Live News Media वृत्तसेवा: कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली विधानसभा क्षेत्रातील जवळ पास १ लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीतून गहाळ झाली आहेत. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यास निवडणूक आयोगाचा गलथान कारभार जबाबदार आहे, असे मनसेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले.
कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली 143 विधानसभा क्षेत्रात एकूण 303 मतदार याद्या होत्या. त्यापैकी सद्य स्थितीला 268 याद्या मध्येच मतदारांची नावे आहेत. त्यामुळे 33 मतदार यादीतील जवळ पास १ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मतदारांना मतदानाचा हक्क गमवावा लागला आहे, असे प्रकाश भोईर व मनसे शहर सचिव संदीप म्हात्रे यांनी सांगितले.
हेही वाचा
ठाणे: बदलापुरात भरदुपारी मतदारांच्या रांगा; ज्येष्ठ नागरिक, नवमतदारांमध्ये उत्साह
ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २६.०५ टक्के मतदान
ठाणे : नौपाड्यात ईव्हीएम मशीन बंद, उमदेवार नरेश म्हस्केनी वेळ वाढवून मागितली
